डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र वराळे हे धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत.
डॉ.जेव्हा परदेशी गेले तेव्हा काही दिवसांसाठी त्यागमूर्ती माता रमाई या वसतिगृह येथे राहिल्या.वसतीगृहातील मुलं पुढील मैदानात खेळत असत.
एक दोन दिवस ती लहान मुले खेळायला आलीच नाही.
म्हणून रमाईने याबाबत वराळे काकाना विचारले दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही.
ती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत
तेव्हा वराळेकाका म्हणाले ती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत.कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.अजून तीन दिवस या मुलांना उपाशीच रहावे लागेल असे वाटते.
त्यावेळी रमाईनी लगेच आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या अंगठी काढून वराळेकाकांना देवून म्हणाल्या तुम्ही ह्या अंगठी-बांगड्या ताबडतोब विकून टाका किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी या लहान मुलांना उपाशी नाही पाहू शकत.
त्यागमूर्ती कारुण्यमूर्ती – माता रमाई वसतिगृह
त्यावेळी वराळेकाका त्या अंगठी-बांगड्या घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात. त्यादिवशी मुलं आनंदाने पोटभर जेवली. त्यांच्या तोंडावर आनंद ओसंडून वहात होता.हे पाहून रमाई आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
हि सगळी लहान मुले रमाबाईस “रमाआई” म्हणून बोलायला लागली.त्या क्षणापासून रमाबाई हि माता रमाई झाली.ती आपल्या सगळ्यांची आई झाली.
डॉ.बाबासाहेबांनी समाजासाठी जसे हाल सोसले झिजले त्याग केला त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी रमाआईने देखील अनेक गोष्टींचा त्याग करत डॉ.साहेबांना साथ दिली.
“बाबासाहेब मी चालले… आता ही आपली शेवटची भेट…यशवंता, मुकुंदा लहान आहेत.
खूप इच्छा होती आपल्या कार्यात मदत करावी,परंतु आता ते शक्य नाही.”
रमाईचे मन फक्त बाबासाहेबच जाणून होते.
रमाई आता काही क्षणांची सोबती आहे. आतातर शब्दही उमटत नाहीत. तिला काहीतरी सांगायचे आहे पण मुखातून शब्द उमटत नसल्याने फक्त ओठांची होणारी हालचाल…अठ्ठावीस वर्षांची समर्थ साथ देणा-या रमाईच्या स्वभावाची बाबासाहेबांना जाणीव होती.
रमाईचे मन फक्त बाबासाहेबच जाणून होते.
आपल्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून राजगृहाची ही मालकीण प्रवेशद्वारावर तासंतास बसून राहायची.
मला भेटावयास आले की, त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागणारी, साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गावं, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपणारी रमा..
कार्यालयीन सचिवाची एकप्रकारे भूमिका पार पाडत होती… हिंदू कॉलनी, परळ, शिवडी विभागात स्वत जाऊन महिलांची भेट घेऊन चळवळीचे महत्त्व पटवून देणारी…
नाशिक त्रीरश्मी लेणी येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on MAY 07, 2021 07:09 AM
WebTitle – tyagmurti mata-ramai-ambedkar
Comments 1