डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्चशिक्षण घेत असताना अपार गरिबीची , संमाराचा व नुकत्याच सुरू झालेल्या चळवळीचा गाडा समर्थपणे पेलून त्यांना मानमिक सामर्थ्य देणाऱ्या त्यांच्या पत्नी व समस्त समाजाची आई…नाशिक त्रीरश्मी लेणी येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
माता रमाई जयंती त्रीरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथील विहारात साजरी करण्यात आली यावेळी सोनाली पाठक, कांता डोंगरे, कांता पराडे , योगिता गांगुर्डे, अंकित दोंदे विजय बर्वे, नितीन पिंपळीसकर, संदेश जाधव आदी उपस्थित होते.
कारुण्यमूर्ती : माता रमाई
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र वराळे हे धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत.
डॉ.जेव्हा परदेशी गेले तेव्हा काही दिवसांसाठी रमाई या वसतिगृहात राहिल्या.वसतीगृहातील मुलं पुढील मैदानात खेळत असत.
एक दोन दिवस ती लहान मुले खेळायला आलीच नाही.
म्हणून रमाईने याबाबत वराळे काकाना विचारले दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही.
तेव्हा वराळेकाका म्हणाले ती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत.
कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही
ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.अजून तीन दिवस या मुलांना उपाशीच रहावे लागेल असे वाटते.
त्यावेळी रमाईनी लगेच आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या अंगठी काढून वराळेकाकांना देवून म्हणाल्या तुम्ही ह्या अंगठी-बांगड्या ताबडतोब विकून टाका किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी या लहान मुलांना उपाशी नाही पाहू शकत.
हेही वाचा.. कारुण्यमूर्ती : माता रमाई
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)