रशियामध्ये दोन महिला ६००० फूट उंच कड्यावर पाळणा बांधून झोका घेत होत्या.एक व्यक्ती त्यांना झोका देत होता.तेव्हा अचानक पाळणा तुटला आणि दोन्ही महिला उंच कड्यावरून खाली पडल्या.मात्र आश्चर्यकारकरित्या त्या बचावल्या आहेत. त्यांना किरकोळ ओरखड्यांखेरीज कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
या दोन महिला रशियन प्रजासत्ताकच्या दागिस्तानमध्ये सुलाक कॅनियनवर बांधलेल्या पाळण्यात बसल्या होत्या.त्यांना त्यांच्यासोबतची एक व्यक्ती झोका देताना व्हिडिओ मध्ये दिसते.इतक्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडते. पाळण्याच्या दोन्ही साखळ्या अचानक तुटून या दोन्ही महिला उंच कड्याच्या काठावरुन खाली पडल्या, मात्र कड्याजवळ लाकडी प्लॅटफॉर्म बनवण्यात आल्याने त्या त्याच्यावर जाऊन आदळल्या यात या दोन्ही महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. सुदैवाने, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
रशियातील स्थानिक वृत्तपत्र कोम्सोमोलस्काया प्रवदा या वृत्तपत्राला सूत्रांनी सांगितले की “महिला घाबरल्या परंतु त्यांना केवळ ओरखडे उमटले परंतु त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली नाही.”
“झोका जास्तीत जास्त उंच हवेत असताना ते घसरले असते तर मात्र काय झाले असते
याची कल्पना करणे सुद्धा भीतीदायक आहे,” असेही सूत्रांनी सांगितले.
या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले आहे.
झोक्याची साखळी तुटून स्त्रिया काठावरुन पडल्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांना मात्र धक्का बसला.
ट्रेड युनियन : आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 16 , 2021 22 : 10 PM
WebTitle – Two women fell off a 6000 feet cliff swing over the Sulak Canyon in Russia 20210-07-16