टिपू सुलतान यांचे नाव ऐकले की डोळ्यासमोर येतो तो एक कर्तव्य दक्ष,उत्तम प्रशासक ,ब्रिटिशांचा कर्दनकाळ/पक्का वैरी,मिसाईल मॅन व एक निर्भीड/न्याय प्रिय राजा..
पण टिपू सुलतान हा भारतात नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे…काहींच्यामते टिपू सुलतान हे एक प्रखड देशभक्त, उत्तम प्रशासक व न्यायप्रिय राजा होते तर काहींच्या मते तो एक अत्यंत क्रूर,लोकांना जबरन इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडणारा, हिंदूंची मंदिरे तोडणारा राजा होता वगैरे वगैरे….
सल्तनत ए खुदादाद
टिपू सुलतान यांच्या जीवन चरित्रावर अनेक पुस्तके लिहली गेलेली आहे.पण यामध्ये काही लेखक सोडून काहिजनांनीच टिपू यांची खरी बाजू समाजाला दाखवली आहे..बरीचशी पुस्तके हे इंग्रजांनी लिहीलेल्या पुस्तकांवरूनच संदर्भ घेऊन लिहिली गेली असल्याने खरा टिपू समाजाला कळालाच नाही, कारण टिपू सुलतान हे इंग्रजांचे पक्के वैरी होते त्यामुळे एक वैरी दुसऱ्या वैऱ्यांबद्दल चांगलं लिहणार कसं ?? काही लेख
कांनी Deeply Research करून,अभ्यास करून टिपू यांची चांगली बाजू समाजाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला त्यामध्येच एक व्यक्ती म्हणजे सरफराज अहमद सर होय…सरफराज सरांनी आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण वर्षे देऊन,Well Research करून,अगदी पुराव्यानिशी शेर ए मैसूर टिपू व त्यांच्या प्रशासनाबद्दल खरी माहिती समाजापुढे “सल्तनत ए खुदादाद”या पुस्तकातून ठेवली आहे…
टिपू सुलतान यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक वैचारिक मित्राने खालील पुस्तक नक्कीच वाचावी व इतरांना सुद्धा वाचण्यासाठी आव्हान करावे…
पुस्तकाबद्दल काही
सुलतान यांनी आपल्या राज्यात जलपुनर्भरण,कृषी धोरण ,धरणे ,व्याजविरहित बँकींग प्रणाली ,
कृषीपूरक उद्योग,साखर कारखान्यांची उभारणी,आधुनिक यंत्रनिर्मिती ,
वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा अशी विविध धोरणे राबवली होती.परराष्ट्र संबंध ,जहाज बांधणी या क्षेत्रांत अविस्मरणीय कामगिरी केली
इतकेच नव्हे तर , त्यांनी रयतेसाठी ‘आठ कलमी ‘ घोषणापत्र प्रसिद्ध केले होते.
राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी,
तसेच कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन,
यात कसूर केल्यास फाशी देण्यात यावी ‘असे या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते..
टिपू सुल्तान यांच्या ग्रंथालयात एक हजार ८८९ इतकी पुस्तके होती ..त्यातील सर्व पुस्तके केंब्रीज व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आजही सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत ..टिपू यांनी स्वत : ४४ पुस्तकांची निर्मिती केली आहे .. टिपू सुलतान यांची ही सर्व पुस्तके देशातील विविध पुराभिलेख विभागात जपून ठेवलेली आहेत . दुर्देवाने इतिहासात क्वचितच त्याची ही बाजू समोर आली आहे..
इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी या पुस्तकातून ‘खरा टिपू सुलतान शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
हे पुस्तक संतुलित,न्यायपूर्ण इतिहास जगासमोर मांडून सामाजिक सौहार्द व एकात्मता सक्षम करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करणार एवढं मात्र नक्कीच !!
लेखन – Moin Humanist
लेखक इतिहास अभ्यासक आहेत.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)