भारतात सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची नेत्यांची सीमारेषा आता राहिली नाही. काँग्रेस जातीव्यवस्थेचे उगड समर्थन न करणारा पक्ष होता.त्याचं पद्धतीने कम्युनिस्ट, पुरोगामी, समाजवादी उघड उघड जातिव्यवस्थेचे समर्थन करत नव्हते पण जातीव्यवस्था आहे हे ते मान्य करीत होते.विचार आणि आचरण त्यामुळेच त्यांच्या विचारात आणि आचरणात नेहमीच तफावत जाणवत होती.
शिवसेना, भाजपा उघड उघड जातीव्यवस्था आणि मनुवादी विचारांची समर्थन करणारे पक्ष होते,ते जाहीरपणे तसे सांगत बोलत असतात आणि आचरणात वेगळे वावरतांना दिसत असतात.यादेशात ज्या काही घटना घडत आहेत घडविल्या जात आहेत त्या विचारधारेने होतात. हिंदू धर्मात पाप व पुण्य याला खूप महत्व आहे. त्यामुळेच बनारस, वाराणशीच्या पवित्र गंगा नदीत पाप पुण्य धुऊन निघते असा समज देशात आहे.पण गंगा नदी शरीर स्वच्छ करते,विचार नाही.आज ही लोकांना कळत नाही.
बच्चा बच्चा राम का जन्म भूमी के काम का
राज्यात व केंद्रात सत्ताधारी बनायचे असेल तर केवळ विचारधारा सांगून तिथपर्यंत पोचणे अशक्य होते म्हणूनच त्यांनी “मुह में राम बगल में छुरी” म्हणत “मंदिर वही बनायेगे,बच्चा बच्चा राम का जन्म भूमी के काम का” प्रसिद्ध म्हणीचा आचरणात वापर केला.अच्छे दिन कोणाला पाहिजेत? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार मुक्त भारत कोणाला पाहिजे?. काळे धन भारतात आणल्यावर कोणाकोणाच्या खात्यात पंधरा लाख रुपये पाहिजे? झिरो बँक खाते कोणी कोणी उघडले? मुद्रा लोन कुणा कुणाला पाहिजे?
सुशिक्षित बेरोजगार मेळाव्यात नांव नोंदणी करून ताबडतोब नोकरी कोणा कोणाला पाहिजे?
या सर्व राजकीय वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागले. आपण कितीही सरळ असलो तरी राजकीय वळणावरून वळवावे लागते.
भारतातील मतदारांना त्यांचे परिणाम भेगावे लागत आहेत असे काही लोक म्हणतात.
पण देशात असंतोष कुठेच फारसा दिसत नाही. काही लोक सतत “आंदोलनजीवी” झाले आहेत.
२०१३/२०१४ ला गल्लीबोळात आंदोलन करणारे तेव्हा देशभक्त होते.आता त्यांच्या कडे कोणतीच नीतिमत्ता राहिली नाही.
विचारधारा आणि आचरण कुठे दिसते काय?
अच्छे दिन येण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले
केंद्रातील सत्ता बदलाने आणि कोरोनाच्या महामारी व लॉकडाऊनमुळे अनेकांना आयुष्यात खूप त्रास झाला. त्यातुन प्रत्येकानां खुप शिकायला मिळाले.कारण त्यांच्यामुळेच नातलग, मित्रमंडळी यांच्यासोबत कसं वागायचं नाही हे चांगलेच समजले. चांगली वस्तु,चांगली व्यक्ती,चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. राजकीय परिवर्तन घडवून आणलं गेले. अच्छे दिन येण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. पण ते दिवसा पाहिले की रात्री झोपताना तेच आता आठवत नाही. म्हणूनच आशा सोडायची नाही.निराश कधी व्हायचे नाहीचं.संघर्ष सोडायचा नाही आणि हार मानायची नाही हे ठरवूनच अमृत मिळत नाही, म्हणून विष पिऊन आत्महत्या बिलकुल करायची नाही.
विचार चांगले ठेवा आणि त्यानुसार आचरण ठेवा.जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल, आणि जर तुमची जीभ गोड असेल तर. हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.हे शंभर टक्के सत्य आहे. म्हणूनच माणसांनी चांगली वस्तु,चांगली माणसे,चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत. त्यासाठीच चांगले विचार आणि आचरण इतरांना प्रेरणादायी असावे.
निसर्गाच्या नियमानुसार पाणी नेहमीच खाली धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो.त्याप्रमाणे जो माणूस प्रयत्नशील राहून प्रयत्न करतो त्याला यशाची,सुखाची,आनंदाची वाट सापडल्या शिवाय राहत नाही. त्यासाठी त्याला अडथळे दूर करण्यासाठी जिद्दीने संघर्ष करावा लागतो.
विचार चांगले आणि आचरण चांगले पाहिजे.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे. कारण ही विसरता येत नाही.अन त्या व्यक्तीला ती परत ही देता येत नाही.अच्छे दिन येतील आणि पंधरा लाख रुपये मिळतील हेच गोरगरिबांना विसरता येत नाही.आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.त्यासाठीच विचार चांगले आणि आचरण चांगले पाहिजे.
भाजपा म्हणजे आर एस एस प्रणित मनुवादी विचाराधारा.
काँग्रेस म्हणजे गांधीवादी विचारधारा वर्णव्यवस्था जातीव्यवस्था खुलेआम नाकारते पण ती कायम टिकवण्यासाठी योग्य ती काळजी घेते.
या दोन राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे भारतीय नागरिका बाबत किती प्रेम आहे?
प्रेम म्हणजे काय? समजली तर भावना ती भी लोक भावना, निवडणूक आयोगाने मांडला तो खेळ, त्यावर विश्वास ठेवून केलेलं मतदान. निवडणूक जाहीर सभेत दिलेले आश्वासन निवडून आल्या नंतर पाळलेच पाहिजे ही माफक अपेक्षा मतदारांची असते. बहुमताच्या जोरावर नागरिकांना मतदारांना अनेक संकटांना सामोरे जाण्याची पाळी आली आहे. त्याविरोधात लढण्याची शक्ती सुद्धा आज मतदारात आणि विरोधी पक्षात दिसत नाही.
दुसऱ्याचे मित्र बना
देशातील सर्व नागरिकांनी काही सुविचाराचा विचार करावा. गरूडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यां कडून शिकावी. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.
भारत देश आज विचाराने एकटा नाही जगातील सर्व देश त्यांच्या सोबत आहेत. कारण हा देश तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना मानणारा आहे. म्हणुनच शेतकरी सत्तर पंचाहत्तर दिवस झाले तरी शांत पणे आंदोलन करत आहेत. कुठे झुंडशाही केली नाही सरकारी मालमतेचे नुकसान केले नाही.कोणत्याही आमदार खासदार यांच्यावर झुंडशाही ने हल्ले केले नाही. कारण विचार आणि आचरण यामुळे देश जगात आदर्श आहे.तोच आदर्श माती मोल करून ठेवण्याचे काम आदरणीय मोदी साहेब त्यांची विचारधारा आणि आचरणातून सिद्द करीत आहेत. आपण यातुन काय घ्यायचे ते घ्या विचार आचरणातून दाखवून द्या.
हेही वाचा .. देशद्रोहाचे कलम लावता येणार नाही,दिल्ली उच्चन्यायालयाची सरकारला तंबी
हेही वाचा .. रवींद्रनाथ टागोरांचा राष्ट्रवाद ; राष्ट्रगीत सक्ती आणि न्यायसंस्था
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 17 , 2021 17:10 pm
Web Title: Thought on recent political development