नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या : नाट्य सिनेमा माध्यमाचे सर्वसामान्य माणसांना खूप आकर्षण असते. काही लोक या माध्यमांकडे दोन घटकेचा विरंगुळा, मनोरंजनाचे साधन म्हणून पाहतात तर काही चोखंदळ प्रेक्षक त्याकडे गांभीर्यपूर्वक पाहतात. काहीजण त्यास समाज प्रबोधनाचे साधन म्हणून पाहतात तर काही जण त्यात उच्च अभिरुची, कलात्मकता शोधतात. विविध प्रवृत्तीच्या माणसांचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असतो. प्रेक्षकांप्रमाणे कलावंत ही त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात.
नाट्य सिनेमा निर्माते मात्र या माध्यमाकडे व्यवसाय म्हणून पाहतात. नाटक सिनेमा निर्माण करायचा म्हणजे आर्थिक बाब महत्वाची असते. नाटकासाठी काही लाख खर्च येतो तर सिनेमांसाठी काही करोड खर्च करावे लागतात. एवढा पैसा एखादा निर्माता त्याच वेळी लावतो जेव्हा त्यास पैसा वसुलतर होईलच पण फायदाही होईल असे वाटते तेव्हा तो या क्षेत्रात उतरतो.
पैसा आणि प्रतिष्ठा ह्या दोन्ही गोष्टी येथे असल्यामुळे स्पर्धा, लॉबी, कंपूगिरी येथे निर्माण झाली आहे. सामाजिक विषमता देशात आजही सर्वत्र आहे त्यास हेही क्षेत्र अपवाद नाही.
नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या
सामाजिक विषमतेचे प्रतिबिंब ह्या क्षेत्रात स्पष्टपणे पाहावयास मिळते. शिवाय या माध्यमाद्वारे विचार प्रभावी पणे मांडता येत असल्यामुळे आपल्याला सोईचे व बहुसंख्य प्रेक्षकांना रुचेल असे विषय येथे प्रामुख्याने हाताळले जातात. मागणी तसा पुरवठा हे तत्व येथे वापरले जाते. रामायण महाभारताचा प्रभाव एकंदरीतच जनमाणसांवर, लेखक, क्रियटिव्ह पर्सन यावर इतका पडला आहे की नायक, नायिका, खलनायक या पलीकडे कथानकच सरकत नाही. त्यातही नायक हा हिंदू फिलॉसॉफी अंगीकारणारा हवा हा अलिखित नियम बनला आहे. कथानक ही पारंपरिक अनिष्ठ चालीरीतींचे उदात्तीकरण करणारे मुख्यत्वे असते. त्यास अपवाद ही असतो नाही असे नाही पण सर्वसाधारण हे चित्र सिने नाटकात पाहायला मिळते. टीव्ही मालिकेमध्ये तर स्त्री व्हीलन हवीच असते. असेच कथानक प्रेक्षक आवडीने पाहत असल्यामुळे व्यवसायचे ते प्रमुख अस्त्र बनले आहे.
ब्राह्मणी विचारधारेचे वर्चस्व
विविध विचारधारेची माणसे जरी या क्षेत्रात असली तरी ब्राह्मणी विचारधारेचे वर्चस्व या क्षेत्रावर आहे. त्याच्या हाती या क्षेत्राची सत्ता एकवटली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जो या सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो त्याचे पंख पद्धतशीरपणे कापले जातात. या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करणे म्हणजे स्वतःचे करियर बरबाद करणे असा अलिखित नियम इथे बनला आहे. म्हणूनच इच्छा असून ही पुरोगामी, फुले, शाहू आंबेडकरी विचारांचे कलावंत, दिग्दर्शक या व्यवस्थेशी मिळते जुळते घेऊन , आपली विचारधारा बाजूस ठेवून काम करीत असतात. दुसरा पर्याय त्यांच्या समोर नसतो. जेव्हा थोडीफार संधी चालून येते तेव्हा ते त्या संधीचे सोने करतात. फ्यांड्री, सैराट याचे चांगले उदाहरणे आहेत. हिंदीत ही असे उदा. आहेत. कलात्मक सिनेमांत ही चाकोरी बाह्य विषय हाताळले जातात. आंधी, चक्र, मंडी, जैत रे जैत, उंबरठा यासारखे सिनेमांत व्यवसाय थोडा बाजूस ठेवून सामाजिक विषयाला प्राधान्य दिलेले असते पण हे अपवाद आहेत असेच चित्र आहे.
नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या
जेव्हा पुरोगामी विचारांचे निर्माते या क्षेत्रात येतील प्रसंगी तोटा सहनकरण्याची तयारी ठेवतील तेव्हाच नवा आयम या क्षेत्राला प्राप्त होईल किंवा जनमाणस पुरोगामी विचारांच्या कलाकृतींना भरभरून प्रतिसाद देतील तेव्हा अशा कलाकृती मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. असे चित्र दक्षिण भारतात तयार होत आहे. त्याची कारणे मला द्रविडियन संस्कृती मध्ये दिसतात. आर्य वैदिकी संस्कृतीच्या विरोधात उभी असलेली द्रविडियन संस्कृती शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पेरियार यांना मानणारा मोठा जनसमुह तिथे असल्यामुळे जायभीम सारखे अनेक पुरोगामी विचारांचे सिनेमे तयार होत आहेत व पब्लिक ही भरभरून प्रतिसाद देत आहे. मात्र दक्षिण भारत वगळता उर्वरित भारतात ब्राह्मणी विचारधारेचे वर्चस्व आहे, ह्याच विचाराचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे सिनेमेही तसेच तयार होत आहेत.
नाटकावर राष्ट्रद्रोहाचा शिक्का
गेल्या सात आठ वर्षांपासून तर परिनिरीक्षण मंडळावर ( सेन्सॉर बोर्डावर ) प्रतिगामी विचारांच्या व्यक्तींच्या नेमणूका झाल्या आहेत . ते पुरोगामी विचारांच्या, फुले , शाहू, आंबेडकरी तत्वज्ञानाची मांडणी करणाऱ्या कलाकृतींना सेन्सॉर मध्ये अडकवून ठेवीत आहेत. एक उदा. म्हणून सांगतो नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे ‘ छावणी ‘ हे नक्षलवाद व ब्राह्मणी विचारधारा वरील नाटक दोन वर्षे अरुण नलावडे यांच्या अध्यक्षतेखालील परिनिरीक्षण मंडळाने अडवून ठेवले होते. त्या नाटकावर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारला होता. पण पत्रकार व चॅनेल वाल्यांनी प्रश्न लावून धरला व शेवटी एकही वाक्य नवगळता नाटक सेन्सॉर बोर्डाने पास केले. नव्हे ते त्यांना करावे लागले. चॅनेल वाल्यांनी, पत्रकारांनी अरुण नलावडे यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांना नीट उत्तरे ही देता आले नाही. गज्वी हे प्रतिष्ठित नाटककार होते म्हणून ते शक्य झाले पण नवखे कलावंत , लेखक, नाटककार यांच्या संहिता , कलाकृती आडवल्या जातात आणि कित्येक महिने, वर्षे तिथेच पडून असतात. शेवटी नाईलाजाने मनाविरुद्ध तडजोड करून सेन्सॉर सम्मत करून घ्याव्या लागतात कारण लाखो, करोडो रुपये खर्च त्या कलाकृतीवर केलेला असतो.
आंबेडकरी विचारांचे कलाकार एका वेगळ्याच कोंडीत
बोधी नाट्य परिषद, मुंबई ही संस्था सातत्याने चांगल्या कलाकृती व चांगले कलावंत निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे.
नाव जरी नाट्य परिषद असले तरी नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र, संगीत आणि सिनेमा या सर्व क्षेत्रात संस्था काम करते आहे.
आतापर्यंत विविध ४६ कार्यशाळांचे आयोजन संस्थेने केले आहे.सहा नाट्य महोत्सव व तीन कलासंगिती ज्यामध्ये नृत्य, नाट्य,
संगीत, चित्रकला, साहित्य असा सर्व कालांचा समावेश होता घेतल्या आहेत.
सिने नाट्य क्षेत्रातील दिग्गज संस्थेशी जोडले गेले आहेत. मुंबई विद्यापीठ,पुणे विद्यापीठ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, विविध साहित्य
आणि नाट्यसंस्था, महाविद्यालये ते अगदी ग्रामीण पातळीपर्यंत विविध उपक्रम राबविले आहे. राबवीत आहे .
आम्ही आंबेडकरी विचारांची, बौद्ध तत्वाज्ञानावरील नाटके गेली ३५- ४० वर्षे स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करीत तोट्यात सादर करीत आहोत
पण आंबेडकरी विचारांचे प्रेक्षक थिएटर कडे फिरकत नाहीत.
आणि आंबेडकर, बुद्ध जयंतीला आमच्या प्रेक्षकांना उडती, भडकती गाणी लागतात.
तत्वज्ञानावरील, शाहू, फुले, आंबेडकरी विषयावरील नाटके त्यांना नको असतात. कलाकारांसाठी मानधन न मागता केवळ जेवढा खर्च एका नाट्य प्रयोगाला लागतो तेवढा ते द्यायला तयार होत नाहीत पण गाण्यांच्या कार्यक्रमाला त्याच्या कितीतरी पटीने जास्त पैसे दिले जातात, ही आमची संस्कृतिक अभिरुची? आम्ही बोधी वाले आमच्या भूमिकेवर ठाम असलो तरी व्यवसाईक नाटक सिनेमातील कलाकारांना मात्र ते शक्य नाही, त्यामुळे आंबेडकरी विचारांचे कलाकार एका वेगळ्याच कोंडीत सापडले आहेत. त्यांना ह्या क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर त्याला तडजोडी कराव्या लागत आहेत . फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे निर्माते निर्माण होत नाहीत तो पर्यंत हे चक्र असेच चालू राहण्याची शकता अधिक दिसत आहे .
जयभीम सिनेमा महाराष्ट्रात घडतोय? अटक केलेला रॅपर गायब?
दलाई लामा यांचा लहान मुलासोबतचा किस व्हिडिओ नेखळबळ
प्रेमी समजून भावा-बहिणीला झाडाला बांधून जबर मारहाण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 11,2023 12:50 PM
WebTitle – Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues