सोलापूर: भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले,त्यानुसार लगेच श्रीकांत देशमुखांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ताबडतोब राजीनामा स्वीकारला.मात्र आता या प्रकरणाला वेगळच वळण लावलं जातंय,आपल्याला चहातून गुंगीचे औषध दिल्याचा आरोप श्रीकांत देशमुख यांनी या महिलेवरच केला आहे.
व्हायरल व्हिडिओ मध्ये काय?
सदर व्हिडिओ सध्या समाज माध्यमात जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसत-हमसत स्वतःचं नाव सांगते. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते. नंतर आलिशान बेडरूममधील डबल बेडवर बनियनवर बसलेल्या या नेत्याकडे मोबाईलचा कॅमेरा करत म्हणते की, ‘हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा,’ असे म्हणत असताना दचकलेला हा नेता ताडकन बेडवरून उठून पुढं येतो.
त्या महिलेला अंगावर धावून येत मोबाईलवरील व्हिडिओ बंद करण्यासाठी ढकला-ढकली करतो.
याचवेळी ती महिला म्हणते, ‘नाही.आता तू बघंच..तुला नाही सोडणार.तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलता ?’
मात्र ती चवताळून बोलत असतानाच कॅमेरा बंद होतो.हा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी सकाळपासून व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडिओ नंतर श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले,
त्यानुसार लगेच श्रीकांत देशमुखांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ताबडतोब राजीनामा स्वीकारला.
राजकीय नेत्यांना लोक चपलेने मारतील
आज सोलापूरमध्ये एक व्हिडिओ वायरल झाला आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा हा व्हिडिओ आहे. हाच श्रीकांत देशमुख मुंबईत जातो. मला हनी ट्रॅप मध्ये अडकवले जाणार आहे, असे सांगतो. अरे हनी ट्रॅप मध्ये कोण अडकतो. ज्यांना अनैतिक संबंध ठेवतात. त्यांना हनी ट्रॅपची भीती असते. मागच्या वेळी कीर्तनकारांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आत राजकीय नेत्यांचा होऊ लागला आहे. अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगलं समजले जात आहेत. अशी कृत्य केली तर लोक काही दिवसानी तुम्हाला चप्पलांनी मारतील. अशी टीका देसाई यांनी केली आहे.
जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करा
सोलापूरच्या या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. त्याला भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे. राजकारण्यांना आपण किती सन्मान दिला पाहिजे. त्यानंतर तो जर चुकतोय तर त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. तरच आपल्या घरातल्या मुली त्याच्या हातून वाचतील असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
नव्या संसद भवनातील अशोक स्तंभ वरून वाद सुरू; बदलण्याची मागणी
छापा मारणारे अधिकारी म्हणाले; “काँग्रेस सरकार पाडा,तुम्हाला मुख्यमंत्री बनवू”
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 12, 2022, 20:50 PM
WebTitle – The video of the woman in the bedroom with the BJP leader shrikant deshmukh solapur went viral