24 जून 1962 रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेल्या गौतम अदानी हे भारतातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.गुजरात विद्यापीठातून बी.कॉम चे शिक्षण अर्धवट सोडुन ते मुंबईत आले आणि आपला व्यवसाय सुरू केला.त्यांनी महिंद्रा ब्रदर्स येथे हिरा सॉर्टर म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि काही वर्षातच मुंबईच्या झावेरी बाजारात स्वतःची डायमंड ब्रोकरेज फर्म सुरू केली.यानंतर मुंबईत काही वर्षे घालवल्यानंतर ते आपल्या भावाच्या प्लास्टिक कारखान्यात काम करण्यासाठी अहमदाबादला परत आले.
येथे गौतमने पीव्हीसी म्हणजेच पॉलीव्हिनायल क्लोराईडची आयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जागतिक व्यापारात प्रवेश केला.पीव्हीसीचा प्लास्टिक वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.अदानी ग्रुपची स्थापना 1988 मध्ये तर अदानी पॉवर लिमिटेडची 1996 , गौतम अदानी यांना 1995 मध्ये मुंद्रा बंदर चालवण्याचे कंत्राट मिळाले व तिथे मोठे यश मिळाले.
एकाच वर्षात सर्वाधिक प्रमाणात संपत्तीमध्ये वाढ
गौतम अदानी यांनी त्यांच्या व्यवसायात विविधता आणली कंपनीने 10 वर्षानंतर वीजनिर्मितीच्या व्यवसायातही काम केले.अदानी पॉवर सध्या देशातील सर्वात मोठी औष्णिक वीजनिर्मिती करणारी कंपनी आहे.अदानी ग्रुप आज पॉवर,नूतनीकरणे,गॅस वितरण,लॉजिस्टिक,रिअल इस्टेट इत्यादी विविध कंपन्यांमध्ये व्यवसाय करीत आहे.
गेल्या वर्षी जगभरात कोरोनामुळे मंदी असतानाही भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत भरघोस वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
या वर्षी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून
एकाच वर्षात सर्वाधिक प्रमाणात संपत्तीमध्ये वाढ झालेल्या अब्जाधिशांच्या यादीत गौतम अदानी यांनी टेस्लाच्या एलन मस्क
आणि अमेझोनच्या जेफ बेजोस यांनाही मागे टाकलं आहे.
नरेंद्र मोदीनी अनेकदा अदानींच्या चार्टर्ड प्लेनने प्रवास केला
2014 मध्ये नरेंद्र मोदींचं भाजप सरकार केंद्रात येण्याआधी अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी कायम चर्चेत होते.
2014 च्या निवडणुकीच्या आधीसुद्धा नरेंद्र मोदींशी असलेल्या जवळीकीमुळे ते कायम बातम्यांमध्ये असायचे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदीनी अनेकदा अदानींच्या चार्टर्ड प्लेनने प्रवास केला होता.
पण भाजपनं त्याबद्दल रीतसर पैसै मोजल्याचं अदानी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं.
गुजरातमध्ये अदानी मोठा व्यवसाय आहे.तिथल्या मुंदरा बंदराचं व्यवस्थापन अदानी ग्रुपतर्फे होतं आहे.
गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या वर्षभरात १६.२ अब्ज डॉलरवरून ५० अब्ज डॉलर इतकी वाढल्याचे ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटले आहे.
गेल्या वर्षभरात अदानींच्या संपत्तीत झालेली ही वाढ जगातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे उद्योगपती जेफ बेझोस व एलन मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीपेक्षा अधिक आहे, असे ब्लूमबर्गचे म्हणणे आहे.अदानी यांच्या समुहातील एक कंपनी वगळता सर्व कंपन्यांच्या शेअर्स किमतीमध्ये यंदा ५० टक्क्यांहून वाढ झाली आहे.अदानी हे भारतातील उदयोन्मुख बडे उद्योजक म्हणून ओळखले जात असून गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत आहे.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा व्यवसाय गेल्या वर्षी ५०० टक्क्याने वाढला
अदानी यांच्या व्यवसायाचा पसारा बंदरे,विमानतळे,डेटा सेंटर्स,कोळसा खाणी असा विविध क्षेत्रात असून द.आफ्रिका,ऑस्ट्रेलिया या देशांतही त्यांच्या मालकीच्या कोळसा खाणी आहेत.ऑस्ट्रेलियातील कॅर्मिशेल कोळसा प्रकल्प हा वादग्रस्त असून या प्रकल्पाविरोधात पर्यावरण संघटना व नागरी संघटना कित्येक महिने आंदोलन करत आहेत.बाजारपेठेत लवचिक उद्योग समजल्या जाणार्यांमध्ये अदानी समूह आपली गुंतवणूक करत असल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे.त्यांनी डेटा सेंटर्सच्या क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर तंत्रज्ञान संबंधित अन्य क्षेत्रांमध्ये ते गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.अदानी एंटरप्राइज लिमिटेडने गेल्या महिन्यात १ गिगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटर उभे करण्याच्या करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
संपत्ती वाढीच्या प्रमाणाच्या बाबतीत मुकेश अंबानी यांनाही मागे टाकलं
या वर्षात अदानी टोटल गॅस लिमिटेडचा व्यवसाय ९६ टक्क्याने तर अदानी एंटरप्राइजचा व्यवसाय ९० टक्क्याने वाढला आहे. त्याच बरोबर अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ७९ टक्के. अदानी पॉवर लिमिटेड व अदानी पोर्टस, स्पेशल इकॉनॉमी झोन्स लिमिटेडचा व्यवसाय ५२ टक्क्याने वधारला आहे.अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा व्यवसाय गेल्या वर्षी ५०० टक्क्याने वाढला आहे.
अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत 16.2 बिलियन डॉलर्सवरुन वाढ होऊन ती 50 बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे.
अदानींच्या उद्योगाच्या शेअर्समध्ये या वर्षी तब्बल 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षापासून अदानी हे जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या उद्योगाचा यशस्वी विस्तार करताना दिसत आहे.
अदानी यांनी संपत्ती वाढीच्या प्रमाणाच्या बाबतीत मुकेश अंबानी यांनाही मागे टाकलं आहे.अदानी यांच्या संपत्तीत या वर्षी जवळपास 1620 कोटी डॉलर्स इतकी वाढ झाली असून मुकेश अंबानींच्या संपत्तीत 810 कोटी डॉलर्सची वाढ झाली आहे. असं असलं तरी संपत्तीच्या बाबतील अदानी हे मुकेश अंबानींच्या खूप मागे आहेत. अदानी यांची संपत्ती पाच हजार कोटी इतकी आहे तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 8480 कोटी इतकी आहे. मुकेश अंबानी जागतिक अब्जाधिशांच्या यादीत दहाव्या स्थानी आहेत तर गौतम अदानी हे 26 व्या स्थानी आहेत.
हे ही वाचा.. आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे
हे ही वाचा.. भांवडलशाही आणि आर्थिक विषमता
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 14, 2021 17:50 PM
WebTitle – The story of Gautam Adani’s rise