बाबासाहेबांच्या अनेक काळाच्या पुढच्या निर्णयामधील एक महत्वाचा निर्णय म्हणजे महार रेजिमेंट स्थापना.ब्रिटिशांच्या मार्शल नॉन मार्शल संकल्पनेला बाजूला सारत बाबासाहेबांच्या पुढाकाराने 1 ऑक्टोबर 1941 ला महार रेजिमेंट स्थापना झाली.महार रेजिमेंटच्या शौर्याच्या गाथा ह्या जागतिक पातळीवरच्या आहेत.बर्मा पासून ते बलूचिस्तान फ्रंटियर पर्यंत महारांनी त्यांचा लढाऊ बाणा दाखवला आहे.महार रेजिमेंट बद्दल त्यांच्या अनेक युद्धामधील उत्कृष्ट कामगिरी बद्दल आपण अनेकदा वाचले आहे ऐकले आहे. पण महार रेजिमेंट बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या बद्दल आजून बऱ्याच लोकांना माहिती नाही.
ऑल इंडिया ऑल क्लास सर्विस
महार रेजिमेंट आधी बॅकवर्ड क्लास लोकांची देशभरातील मागासवर्गीय लोकांची रेजिमेंट होती पुढे जाऊन ती ऑल इंडिया ऑल क्लास सर्विस झाली.
जिथं जास्त रिस्क तिथं सुरवातीला महार रेजिमेंट
मुळात जिथं जास्त रिस्क तिथं सुरवातीला महार रेजिमेंट ला डिप्लोय केल्याचे उदा.तुम्ही पाहू शकाल.
महार रेजिमेंट नी युद्धाच्या मैदानात जशी दमदार कामगिरी केली
तशी ह्या अतिशय डीसीप्लिन रेजिमेंट ने भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान महत्त्वाचे आणि तेवढेच संयमाचे काम केले ते म्हणजे –
फाळणी काळात जो हाहाकार माजला त्यात इथून विस्थापित होणाऱ्या मुस्लिम लोकांना सुरक्षा देण्याचे काम महार रेजिमेंट ने केले.
एवढेच नव्हे तर एक तुकडी पाकिस्तान मधे गेली होती
व त्यांनी तिथून येणाऱ्या काही हिंदू-शीख समुदायाला सुखरूप आणण्याचे काम चोख बजावले होते.
सेम थेअरी श्रीलंकेत महार रेजिमेंट बद्दल वापरली गेली
नवीन प्रांत त्यावेळी आतासारखे कम्युनिकेशन साधन कमी तिथं सुद्धा महार रेजिमेंट ने आपली अद्वितीय कामगिरी केली.
मशीनगन चालवणारी पहिली भारतीय रेजिमेंट म्हणून महार रेजिमेंटची इतिहासात नोंद
महार रेजिमेंट जेवढी शूर आहे तेवढीच ती क्विक लर्नर आहे. नवीन नवीन गोष्टी लवकर आत्मसाद करणे हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण आहे.महार रेजिमेंटचा जुना लोगो पहिला तर त्यात MG ही दोन अक्षरं आपणाला दिसतील. ती दोन अक्षरं आहेत Machine Gun ऑटोमॅटिक मशीन गन चालवणारी पहिली भारतीय रेजिमेंट म्हणून महार रेजिमेंटची इतिहासात नोंद आहे.त्या गनला Vickers Gun असे सुद्धा म्हणले जाते. पारंपरिक युद्धतंत्र ज्यात मॅन्युली लोडेड बंदुका आणि ह्या विकर ऑटोमॅटिक गन खूप फरक आहे.ह्यात मॅकिनिझम आहे टेक्नॉलॉजी आहे.हे सगळं समजून घेऊन त्याला अतिशय कमी काळात युज टू होऊन अनेक युद्धात शत्रूला पाणी पाजण्याचे काम महार रेजिमेंट ने केले आहे.
स्वातंत्र्य उत्तर काळात जेवढे मिलिटरी ऑपरेशन झाले त्या सगळ्या ऑपरेशन मधे महार रेजिमेंटचा सहभाग आहे. बाबासाहेबांनी ह्या अतिशय मेहनती,चिवट,शूर,देशप्रेमी लोकांना महार रेजिमेंटच्या रूपाने एक प्लॅटफॉर्म दिला आणि महार रेजिमेंट ने त्यांच्या कर्तृत्वाने/निर्भीड/निडर गुणाने हर एक युद्धभूमीवर विजयाचे झेंडे गाडलेत. महार रेजिमेंट मधील सर्व अधिकारी/सैनिक/माजी सैनिक त्यांच्या कुटुंबियांना सॅल्युट जय हिंद
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 01, 2021 23:04 PM
WebTitle – The saga of the bravery of the Mahar Regiment