सुप्रसिद्ध दिग्दशर्क नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित झुंड चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.अनेक ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल असून लोकांना तिकीट मिळत नाहीत असे समजते.नागराज नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालून प्रेक्षकांना दरवेळी एक नवा अनुभव देत असतात त्यामुळे हा चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि त्यामुळेच चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे.मराठी प्रेक्षकांना आणखी एक आनंदची बातमी म्हणजे नागराज मंजुळे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर देखील एक चित्रपट करत आहेत.मात्र जागतिक महामारीच्या संकटाने एका चित्रपट निर्मितीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
2019 मध्ये, नागराज मंजुळे आणि अभिनेता-निर्माता रितेश देशमुख यांनी अखिल भारतीय स्तरावर चित्रपट ट्रायोलॉजीची घोषणा केली होती.
या चित्रपटाला रितेश देशमुख यांच्या प्रोडक्शन बॅनर – मुंबई फिल्म कंपनीची भागीदारी असून 2021 मध्ये रिलीज होणार होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट
“कोरोना साथीच्या रोगामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे आम्ही दोन वर्षे गमावली ज्यामुळे नैसर्गिकरित्या आम्ही हे काम फ्लोअर वर घेऊ शकलो नाही. पण याचा अर्थ चित्रपट रखडला आहे असे नाही. हा एक प्रकल्प आहे ज्याबद्दल मी अत्यंत भावनिक आणि उत्साही आहे आणि एकदा सर्व काही गोष्टी व्यवस्थित झाल्या की तुम्हाला कळेलच,” असं नागराज मंजुळे यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलंय.
सर्व रसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.सर्वच मराठी जनांना (trilogy based on Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट एक पर्वणी ठरवणार आहे,सगळेच या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत.
माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे
फॅन्ड्री, सैराट आणि त्यांच्या अलीकडच्या हिंदी पदार्पण, झुंड यांसारख्या मराठी चित्रपटांनंतर हा प्रकल्प चित्रपट निर्मात्याची सर्वात मोठी निर्मिती म्हणून पाहिला जात आहे.
नागराज मंजुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट निर्मिती करणे हे प्रचंड आव्हानात्मक असेल. “हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. पण शेवटी आम्ही चित्रपट बनवत आहोत त्यामुळे चित्रपट बनवता आम्ही ज्या गोष्टींची काळजी घेतो ते नियम परिमाणे असतीलच ती बदलणार नाहीत, आमच्यासाठी फक्त विषय बदलतील. अर्थात, चित्रपटाच्या विषयामुळे चित्रपट स्वतःची आव्हाने घेऊन येणार आहे.
“मी लहान असतानाही शिवाजी महाराजांवरचा चित्रपट किती छान असेल असे मला वाटायचे. मी त्यांच्यावरील दोन चित्रपट पाहिले होते आणि आपणही असा एखादा चित्रपट बनवला पाहिजे असं मला वाटलं,त्यामुळे माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे,” असं ते पुढे म्हणाले.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
B झुंड सिनेमा : तीनचार परिप्रेक्ष्यांतून पाहायचा चित्रपट
C झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 08, 2022 13: 34 PM
WebTitle – The reason behind the delay in the film on Chhatrapati Shivaji Maharaj – Nagraj Manjule