1 एप्रील 1935
भारतीय रिजर्व बॅकेच्या स्थापने पुर्वी Hilton Young Commission जे Royal commission on Indian currency and finance या नावाने भारतात दाखल झाले. भारतीय अर्थव्यवस्था व त्याचे स्वरूप बघण्याकरीता त्यांच्या जवळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र विषयाच्या पीएचडी करीता लिहीलेला शोधप्रबंध ” The Problem of Rupee – its originate and solution “हे पुस्तक सोबत घेवून आलेले होते.
डाॅ. बाबासाहेबांच्या या शोधनिबंधातील मार्गदर्शक तत्वे, त्याचे विचार, दृष्टीकोन, चलन व त्यावरील उपाय, आणि सूचना याचा सखोल अभ्यास करून या कमीशनने 1929 ला भारतात रिजर्व बॅक स्थापनेकरीता आपला रिपोर्ट दाखल केला आणि त्यावर अमंलबजावणी करत भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देण्याकरीता 1 एप्रिल 1935 मध्ये Reserve Bank of India ची स्थापना झाली. या RBI च्या स्थापने संपुर्ण श्रेय हे त्या काळातील भारतातीलच नव्हे तर ऐशीयातील एकमेव अर्थतज्ञ असलेल्या डाॅ. बाबासाहेबांना जाते.
जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ
३ वर्ष कोलंबीया विद्यापीठात असतानां अर्थशास्त्रातील २९ विषय, इतिहासातील ११ व समाजशास्त्रातील ४ व मानववंशशास्त्रातील, तत्वज्ञान विषय तसेच जर्मनी व फ्रेच भाषा इत्यादी विषय घेवून शिकणारे व लंडन स्कुल आॅफ एकोनाॅमिक्स मध्ये Edwin Canan यांच्या मार्गदर्शनात शोधनिबंध सादर करून 1923 ला व कोलंबीया विद्यापीठात 1927 ला पीएचडी प्राप्त करणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर…!
ज्यांच्या घरी अठराविश्व दारीद्र होत, समाज गरीबीने खितपत पडलेला होता तिथे अर्थशास्त्रात पी.एचडी मिळविणारे व जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ म्हणून लौकीक प्राप्त केलेले डाॅ. बाबासाहेब एकमेवाव्दीतीयच…..!!
यात डाॅ. बाबासाहेबांच्या मते “भारतातील सामान्य खरेदी शक्ती वाढल्यास चलनाचा घरगुती दाह कमी होईल
आणि शेतीत नसलले रोजगार हे कारखाने, उद्योगधंदे स्थापून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देत एक स्वयंचलीत आर्थिक व्यवस्थापन निर्माण करतील”
The Problem of Rupees – its origin and solution
अर्थशास्त्रत पदवी मिळवतांना व शोधनिबंध सादर करतांना ” The Problem of Rupee – its origin and solution ” या वेधक विषयावर लिखान करून भारतातील ब्रिटीश राजवटीतील भारतीय चलनाचे अवमुल्यन, विदेशातील कमी किमंतीतील वस्तुचे आकारण्यात येणारे चढे भाव,चलनाची घसरणारी किमंत,भारतातील गरीबी दारीद्र आणि व्यवसाय उद्योग व कामगारानां न मिळणारे काम,बेरोजगारी यावर रोखठोक मत मांडून ब्रिटीश राजवटीत भारतावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकारच या शोधनिबंधाच्या माध्यमातून केला गेला.या शोधनिबंधावर त्या काळात बरीच चर्चा ही झाली परंतु अखेर हा शोधनिबंध मंजूर करण्यात आला.
डाॅ. बाबासाहेब म्हणतात –
“भारतीय चलनाची मोठ्या चढातील अवमुल्यन हे व्यवसाय उद्योगाला व आयातीला परिणामकारक ठरतात आणि निर्यातीला चालना देतात. परंतू या अलमूल्यना मुळे बाहेरून येणा-या वस्तुंच्या किंमती वाढून त्याचा परिणाम गरीब व मध्यमवर्गीयाच्या उपजीविकेवर पडतो”.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय रिजर्व बॅक एक स्वायत्त संस्था म्हणून अस्तित्वात आली आणि भारतातील चलन व्यवस्था सुधारीत करत,
चलनातील फुगवटा रोखत, परकीय चलनाची गुतंवणुक, चलन वाढ, बॅकांचे व्यवहार, अश्या अनेक पैलूतून
भारतातील अर्थव्यवस्थेला सुधारीत करत त्याला मजबुत करण्याचे काम ती करत आली.
बॅकांचे व्यवहार, व्याजदर निश्चिती, सोने तारण व सेफ डीपाॅझीटस इत्यादी अनेक महत्वपुर्ण बाबीवर
रिजर्व बॅक नियत्रंण ठेवत आर्थीक व्यवहार व चलन सुव्यवस्थित करण्यास मदत करत असते.
सरकारी बॅकांचे आज होत असलेले विलगीकरण आणि खाजगीकरण,
भारतीय चलनाचे आजचे झालेले चितांजनक अवमुल्यन आणि अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा हे भारतातील चुकीच्या हातात दिले गेलेले अर्थकारण हे आहे.
याला पून्हा सबळ करून बळ व भरारी देण्याचे कार्य डाॅ. बाबासाहेबांचे अर्थव्यस्थेवरील विचार करू शकतात यावर आजही दुमत नाही.
हे ही वाचा.. आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे
वाचा.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला वर्ग
हे वाचा.. संविधानामुळे भारतीय स्त्रिया गुलामीतुन मुक्त
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 01, 2021 01 : 00 PM
WebTitle – The Problem of The Rupees and RBI- 2021-04-01