इंदोर : 26 जानेवारीच्या विशेष प्रसंगी समाजसेवक मुरलीधर राहुल मेटांगे यांनी अर्पित यादव आणि शिखा यादव यांच्या विवाह सोहळ्यात भारतीय राज्यघटना भेट स्वरूपात दिली.इंदोर शहरात विवाह व आशीर्वाद समारंभाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे पुस्तक आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देण्याची प्रथा सुरू झाली आहे.
विवाह सोहळ्यात भारतीय राज्यघटना भेट स्वरूपात
त्यांच्या मैत्रीला 29 वर्षे झाली आहेत. यावेळी मनोज यादव, सुनीता यादव, अतुल वर्मा, चिंटू बाबा, प्रशांत यादव, खुशबू यादव, मेहक यादव, हर्षी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य आणि मित्र उपस्थित होते.समाजसेवक मुरलीधर राहुल मेटांगे हे त्यांच्या डॉ. आंबेडकर युवा समितीच्या माध्यमातून सन 2016 पासून इंदोर शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व प्रतिष्ठित व्यक्तींना भारतीय राज्यघटना भेट देण्याची मोहीम राबवत आहेत.
आतापर्यंत त्यांनी 41 महत्वाच्या व्यक्तींना अशा भेटी दिलेल्या आहेत. ज्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इंदोरचे विभागीय आयुक्त , इंदोरचे जिल्हाधिकारी , इंदोर च्या महापौर मॅडम, इंदोर महानगरपालिका आयुक्त, इंदोर रेल्वे स्टेशनचे क्षेत्रीय अधिकारी, MPPSC कार्यालयाचे अध्यक्ष, DIG इंदोर पोलिस, इंदोर पोस्टल विभागाचे आयुक्त,इंदोरचे पीएफ कमिशनर महोदय, इंदोरचे नगर निगम झोनल अधिकारी, फ़िल्म अभिनेता सोनू सूद, फ़िल्म व टीवी अभिनेता गगन मलिक सहित अनेक राजकीय सामाजिक कलाकार व्यक्तींना तसेच व आश्रमांना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि भारतीय राज्यघटनेचे पुस्तक भेट स्वरूपात दिले आहे.
डॉ.आंबेडकर युवा समिती (DAYS) तर्फे चित्रपट अभिनेते सोनू सूद यांचा सन्मान
डॉ.आंबेडकर युवा समिती (DAYS) तर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. डॉ.आंबेडकर युवा समितीमध्ये
भीमराव सरदार, ईश्वर तायडे, भरत निंबाडकर, रघुवीर मरमट, महेश जाटव, सुमित गुरुचाळ,
लोकेश पिसे, योगेंद्र गावंडे, लोकेश इंद्रे यांचा समावेश आहे.
डॉ.आंबेडकर युवा समिती (DAYS) तर्फे चित्रपट अभिनेते सोनू सूद यांचा सन्मान
गुगल चे सीईओ सुंदर पिचाई विरोधात FIR दाखल,कॉपीराइटचा मुद्दा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 28, 2022 17:03 PM
WebTitle – The Indian Constitution was given as a gift in the marriage ceremony