गुगल चे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करत ही तक्रार दाखल केली आहे.गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, ज्यांना यावर्षीचा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे, ते आता अडचणीत सापडले आहेत.
काय आहे सुंदर पिचाई च्या विरोधात FIR प्रकरण?
न्यायालयाच्या निर्देशानुसार चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी गुगल चे सीईओ सुंदर पिचाई आणि कंपनीच्या इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.आपल्या तक्रारीत चित्रपट दिग्दर्शकाने म्हटले आहे की, गुगलने त्यांचा एक हसीना थी एक दिवाना था हा चित्रपट कॉपीराइटशिवाय यूट्यूबवर अपलोड केला आहे. त्यानी आरोपात म्हटलं की YouTube वर अनेक युजर्स (वापरकर्ते) चित्रपट अपलोड झाल्यानंतर त्याच्या एक्सक्लूसिव कंटेंटचा अशा प्रकारे गैरवापर करत आहेत, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी कॉपीराइट प्रकरणी न्यायालयात धाव घेत कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१, ६३ आणि ५९ अंतर्गत अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या संदर्भात एका वेबसाईटशी बोलताना सुनील दर्शन म्हणाले की, मी माझा सिनेमा कुठेही अपलोड केलेला नाही आणि जगात कोणालाही विकला नाही, असा माझा चित्रपट यूट्यूबवर लाखो वेळा पाहिला गेला आहे. याविरोधात मी गेल्या अनेक वर्षांपासून युट्युबच्या विरोधात लढा देत आहे, पण आजपर्यंत मला प्रतिसाद मिळालेला नाही.
ते पुढे म्हणाले की यूट्यूबवर चित्रपट अपलोड केल्यामुळे लोकानी तो लाखो वेळा पाहिला ज्यामुळे माझे खूप मोठे नुकसान झाले.
हा चित्रपट त्यांच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यासाठी
मी गुगलला विनंती करत राहिलो आणि अनेक दरवाज्यांवर चकरा मारत फिरत राहिलो.
पण शेवटी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मला कोर्टात जावे लागले.
त्यांनी सांगितले की, न्यायालयाने त्यांच्या बाजूने आदेश देताना पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणात एक अब्जाहून अधिक वेळा कॉपीराइटचे उल्लंघन झाले असून प्रत्येकाची नोंद माझ्याकडे आहे, असे सुनीलने सांगितले. सुनील दर्शन या संदर्भात सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत. तसेच, त्यांना या बाबतीत तडजोड करण्यास हरकत नाही, मी फक्त माझ्या हक्कासाठी लढत आहे..असंही ते म्हणालेत.
‘एक हसीना थी एक दिवाना था‘ या चित्रपटाचा काय आहे वाद?
या खटल्यातील सुनील यांच्या वकिलाने सांगितले की,
‘एक हसीना थी एक दिवाना था’ या चित्रपटाचे हक्क सुनील दर्शन यांच्याकडे आहेत.
अशा परिस्थितीत सुनीलशिवाय हा चित्रपट अपलोड करण्याचा अधिकार कोणाला नाही.
सुनील दर्शन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत.
2017 मध्ये त्याचा शेवटचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना’ रिलीज झाला होता.
त्याच्या नकळत हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याचा आरोप दर्शनने केला आहे.
सुंदर पिचाई यांच्याबद्दल सांगायचे तर, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.
या अंतर्गत पद्म पुरस्कारांसाठी एकूण 128 जणांची निवड करण्यात आली होती,
त्यापैकी 4 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
यादरम्यान गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली.
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 27, 2022 23:30 PM
WebTitle – FIR filed against Google CEO Sundar Pichai, alleging copyright infringement