सरकारी नोकरी हे अनेकांचं स्वप्नं असतं,शिवाय भारतात मुलींना पती म्हणून अन मुलींच्या पालकांना सरकारी नोकरी करणारा जावई हवा असतो,सरकारी नोकरी करणाऱ्या जावयाची डिमांड जास्त असते.हे समाजाचं वास्तव आहेच,परंतु आजकाल मुलीही जॉब करतात,अन त्यात सरकारी नोकरीही करतात.त्यामुळे हा विचार आता थोडा मागे पडत चालला आहे.परंतु सरकारी नोकरी साठी भरती साठी अनेक तरुण वर्षानुवर्षे वाट पाहत असतात.यासाठी ते अनेक प्रकारच्या परीक्षा देतात,त्यांची तयारी करतात.अभ्यास करतात,हे सगळं करत असताना अर्थातच काळ आपल्यासोबत नसतो,वेळ कुणासाठीच थांबत नाही,त्यात सरकारी धोरण म्हणजे आणखी एक तापदायक प्रकार त्यामुळे सरकारी नोकरी साठी भरती साठी अर्ज करताना उमेदवाराचे वय मात्र निघून चालले असते.मात्र अशा उमेदवारांना आता काहीसा दिलासा देणारा निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला आहे.
वयाच्या 43 व्या वर्षीही मध्य प्रदेशात सरकारी नोकरी मिळू शकणार
आता वयाच्या 43 व्या वर्षीही मध्य प्रदेशात सरकारी नोकरी मिळू शकणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भरती परीक्षेतील वयोमर्यादा वाढवून राज्यातील सुमारे ५० हजार उमेदवारांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर मध्यप्रदेशात येत्या काही दिवसांत होणाऱ्या सुमारे एक लाख पदांच्या भरतीमध्ये जास्त वयाच्या उमेदवारांना लाभ मिळणार आहे.
सरकारी नोकरी भरती साठी असा असेल नवा नियम व अटी
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षा होऊ शकल्या नाहीत.
वयोमर्यादेत तीन वर्षांची शिथिलता जाहीर केल्याने ज्या उमेदवारांचे वय जास्त आहे त्यांना फायदा होणार आहे.
वयोमर्यादेतील सूट ही भरतीची पहिली जाहिरात जारी केल्याच्या तारखेपासून मोजली जाईल आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत जारी केलेल्या जाहिरातींमध्ये लागू होईल. मात्र,वयोमर्यादेतील सूटचा लाभ हा एकदाच घेता येणार आहे.तसेच हा लाभ केवळ थेट भरतीने भरल्या जाणाऱ्या पदांसाठीच अटी लागू राहतील.
दुरुस्ती आदेश जारी, जाणून घ्या काय असतील तरतुदी
सरकारी सेवांमध्ये थेट भरतीच्या पदांवर नियुक्तीसाठी निश्चित केलेल्या कमाल वयोमर्यादेत सुधारणा करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. 43 वर्षांपर्यंतचे उमेदवार परीक्षेला बसू शकतील. राज्यातील खुल्या स्पर्धेत लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी वयोमर्यादा 21 ते 43 वर्षे राहील. व्यापमच्या परीक्षांमध्ये वयातही तीन वर्षांची सूट असेल.
आरक्षित वर्गांना अधिक फायदा
लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील वर्ग III आणि IV साठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. ओबीसी महिलांसाठी उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आहे. नवीन आदेशानंतर, एमपी लोकसेवा आयोगातून भरल्या जाणाऱ्या या संवर्गासाठी वयोमर्यादा २१ ते ४८ वर्षे असेल आणि आयोगाच्या परिघाबाहेरील पदांसाठी, थेट पदांवर नियुक्तीसाठी वय १८ ते ४८ वर्षे असेल. भरती
केंद्रीय तपास यंत्रणा च्या गैरवापराच्या विरोधात बंगाल विधानसभेत ठराव पास
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 20,2022, 11:22 AM
WebTitle – The age limit for government job recruitment has been increased to 43 years