महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात बहुचर्चित व अग्रणी असलेल्या आणि बौध्द धम्माप्रती बांधीलकी असणारी संस्था म्हणजे 8 जानेवारी 2017 रोजी विश्व बौद्ध धम्म ध्वज दिना निमित्त पहिली धम्म परिषद घेवून स्थापन झालेली ‘युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य.’ युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात गेली 7 वर्षे धम्मप्रसार करण्याचे विधायक कार्य विविध उपक्रमांद्वारे सातत्य राखुन करत आहे. गेली 7 वर्षे – ‘दर रविवार जाऊया बुद्ध विहार’, ‘विविध महापुरुषांच्या ग्रंथांवर धम्मचर्चा’, ‘लेणी अभ्यास दौरे’ इत्यादि कृतिकार्यक्रमातुन धम्माच्या विविध प्रकारच्या अडचणी आणी समस्यांवर आवाज बुलंद करुन लढा देत आहे याचा संपूर्ण महाराष्ट्राला आणि कर्नाटकाला सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शील या विचारांवर चालणारी प्रगतीशील संस्था/संघटना अशी युवा बौद्ध धम्म परिषदेची ख्याती दूरवर पसरलेली आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार
दरवर्षी युवा बौद्ध धम्म परिषद ‘8 जानेवारी रोजी विश्व बौध्द धम्म ध्वज दिनानिमित्त’ भंते नागरत्नजी सभामंडप, हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे धम्म परिषदेचे आयोजन करत असते. या निमित्ताने दरवर्षी ख्यातनाम वक्ते यांचे समाजहितकारक विषयांवर व्याख्यान आणि वेगवेगळ्या आदरणीय भंतेजींची धम्मदेसना आयोजित करत असते. त्याचप्रमाणे बौध्द धम्म आणि महापुरुषांना वंदन करण्यासाठी गायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गायकांची तसेच गायन कलाकारांची कला सादर करण्याचे आयोजन करण्यात येत असते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला जातो.

यावर्षीदेखील भंते नागरत्नजी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील धम्म चळवळीस गती प्राप्त करण्यासाठी दि. 8/1/2023 रोजी भंते नागरत्नजी सभा मंडप, यशवंत हॉल, चांदीनगर हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे ७ व्या युवा बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभावी धम्मदेसना
या धम्मपरिषदेची सुरुवात माता रमाई गायन पार्टी, मांगूर यांच्या सुश्राव्य बुद्ध आणि भीमगीतांनी झाली. आवेशपूर्ण गीतगायनामुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. यानंतर आदरणीय भंते पय्यावजीरो, प्रमुख वक्ते श्रावणदादा गायकवाड, शिक्षक नेते सदानंद भोसले, माजी शिक्षण संचालक महावीर माने, सुशांत कांबळे, संगिता कांबळे, युवा बौद्ध धम्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण भोसले, राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष भोसले, राज्य सचिव सतिश भारतवासी, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राजहंस, यांनी महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर आदरणीय भंते पय्यावजीरो आणि उपस्थित उपासक आणि उपासिकांना त्रीसरण, पंचशील दिले. युवा बौद्ध धम्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण भोसले यांनी धम्म परिषदेचे प्रास्ताविक आणि स्वागत केले. आदरणीय भंते यांनी अगदी सहज सोप्या भाषेत आणि प्रभावी धम्मदेसना दिली.
बौद्ध परंपरा दशा आणि दिशा
यावर्षीचे प्रमुख व्याख्याते मा. श्रावणदादा गायकवाड, औरंगाबाद यांनी “बौद्ध परंपरा दशा आणि दिशा” या विषयावर
अत्यंत आवेशपूर्ण आणि मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
त्यांनी धम्मात येणार्या सर्व प्रकारच्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे,
धम्म केवळ एका जातीपुरता मर्यादित न राहता सर्व जातीधर्माच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले पाहिजे,
ओबीसी, आदिवासी, तसेच सवर्ण समाजातील बांधवांनीही धम्म स्विकारला पाहीजे असे मत व्यक्त केले.
धम्मभूमी गुगवाडचे निर्माते ऍड.सी.आर.सांगलीकर साहेब यांची या परिषदेतील उपस्थिती लक्षवेधी ठरली.
साहेबांचे सर्वांनी उभे राहून स्वागत केले. सांगलीकर साहेबांनी आपल्या मनोगतात
युवा बौद्ध धम्म परिषदेच्या कृती कार्यक्रमांचे कौतुक केले आणि सातत्यपूर्ण कार्याचे अभिनंदन केले.
यानंतर धम्मवाढीसाठी कार्य केलेल्या तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी स्वतःचे सर्व धनसंपदा पणाला लावून चित्रीकरण केलेल्या स्मृतीशेष आमदार, लेखक नामदेवराव व्हटकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार त्यांचे वंशज मा. जयवंत व्हटकर, मा. महेश व्हटकर, मा. यशवंत व्हटकर, मा. मिलिंद व्हटकर यांनी स्वीकारला. त्याचबरोबर स्मृतीशेष वाय. एस. कांबळे सर यांनाही मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भोजन अवकाशानंतर आदरणीय भंते पय्यावजीरो, भंते आर. आनंद, आणि भंते राहुल यांनी धम्मदिक्षा घेऊ इच्छिणाऱ्या 35 उपासक, उपासिकांना 22 प्रतिज्ञा, त्रीसरण, पंचशील देऊन धम्मदिक्षा दिली. भंते राहूल यांनी धम्मदेसना दिली. यांनतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार मा. राजू शेट्टी यांचे आगमन झाले. मा. राजू शेट्टी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या भारतासाठी किती व्यापक आणि उपयुक्त आहेत हे विषद केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
कार्यक्रमाच्या पुढील भागात धम्मकार्यात तन मन धनाने वाहुन घेतलेल्या विविध गावच्या विहारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कला, धम्मकार्य, औद्योगिक आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक महान व्यक्तींचा सत्कार व सन्मान भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्काराने करण्यात आला. खास पुण्याहून आलेल्या शांताताई बनसोडे यांनी महापुरुषांवरच्या गेय कविता सादर केल्या.
शेवटच्या सत्रात संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी संविधानावरचे व्याख्यान अत्यंत प्रभावीपणे सादर केले.
उपस्थित उपासकांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संविधान आणि त्याचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्यातही अनेक उपासकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
कार्यक्रमासाठी अनेक ग्रंथ विक्रेते, फोटो फ्रेम विक्रेते, विविध प्रकारचे स्टॉलही लावण्यात आले होते.
या धम्मपरिषदेचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. संतोष भोसले व स्वप्निल गोरंबेकर यांनी केले. राज्य सचिव सतिश भारतवासी यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रवक्त्या अनिता गवळी, विनोद कांबळे, योगेश कांबळे किरवेकर, मोहिंदर लिगाडे, सांगली जिल्हा महिलाध्यक्ष वंदना कांबळे,
करवीर तालुका महिलाध्यक्ष मुक्ताताई भास्कर, वाळवा तालुका महिलाध्यक्ष मंदाताई सोनताटे,
प्रा. सचिन कांबळे साजणीकर, संतोष ऊर्फ रेगन कांबळे, शुभम शिंदे, विक्रांत मोरे, मंगेश कांबळे,प्रदीप सातपुते, रोहिणी कांबळे,
विजय कांबळे वाघवेकर, वैशाली कांबळे, विजय कांबळे मुडशिंगी,नितीन कानडे, नितीन यादव, सागर जाधव, अश्विनी कांबळे, कृष्णा कांबळे,
प्रा. रणजीत भोसले, पल्लवी कांबळे, राकेश धनवडे, मंदार कुरणे, युवराज कांबळे, रविंद्र माळगे,
अच्युत कांबळे, मार्शल ज्योती डोंगरे, मार्शल सुनिता खिल्लारे, आकाश कांबळे, राहूल वराळे,
जयश्री सोरटे, अमर कांबळे, आनंदा कांबळे, संतोष गोरे, अरूण शिंगे, दिगंबर कांबळे,अशोक कांबळे वाघवेकर, प्रताप शितोळे आदींनी परिश्रम घेतले.
सातवी युवा बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरुपात मदत केली.
त्या सर्व उपासक उपासिकांचे युवा बौद्ध धम्म परिषद आभार व्यक्त करत आहे.
आपला युवा बौद्ध धम्म परिषदेवरील स्नेह सदैव वृध्दिंगत व्हावा अशी आम्ही मंगल कामना करत आहोत.
आपण दिलेल्या स्नेहामुळे, मदतीमुळे आणि आशिर्वादाने सातवी युवा बौद्ध धम्म परिषद अत्यंत यशस्वी झाली
त्याबद्दल सर्व हितचिंतक, उपासक, उपासिका, ज्येष्ठ मार्गदर्शक, लहानमोठ्या सर्व बांधवांचे आम्ही ऋणी आहोत.
युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य.
मुक्ती संघर्ष समिती ला राजू शेट्टी यांच्याहस्ते पुरस्कार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 11,2023 13:16 PM
WebTitle – The 7th Yuva Buddhist Dhamma Conference concluded with enthusiasm