राष्ट्रीय चहा दिवस : बहुतांश लोकांची सकाळ ही सकाळच्या वाफळत्या चहाने होते.आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे.चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय 2012 ला घोषित करण्यात आलं.लहानपणापासून आजवर चहा-चपाती हाच सकाळचा नाश्ता होता,म्हणजे आजही आहे. आईच्या पुढ्यात बसायचं गरमागरम तव्यावरची चपाती आई ताटात द्यायची तो नाश्ता करून शाळेला पळायचं,तेव्हा ग्लासभरून चहा असायचा. याचं आश्चर्य पत्नीला सुद्धा,म्हणाली हे कधी कुठे पाहिलं नाही एवढा चहा कोण पीतं? वडील असताना आमच्या घरात खडाजंगी चर्चा आणि चहावर चहा असं समीकरण होतं फुले शाहू आंबेडकर गांधी नेहरू तत्कालीन राजकरण सगळं चहावर बेतलेलं..
चहाचं नातं वेगळं
ऑफिसलाला जाईपर्यंत आणि आताही अलिकडपर्यंत चहा काही सुटला नाही.चहाचं नातं सगळ्या पेयात वेगळं आहे.दोन लोक भेटले की उत्सव करतात.तीनचारही म्हणजे संख्या महत्वाची नाही. लोकं भेटली की उत्सव होतो.हे खरं.कारण मनुष्य हा उत्सवप्रेमी प्राणी आहे.काही उत्सवप्रेमी वेगळ्याप्रकारे उत्सव साजरा करू शकतात. करतात.परंतु साधारणपणे चहा हे एक पेय सर्वमान्य पेय आहे.म्हणून चहाचं नातं वेगळं आहे.त्याला प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्थान आहे.
काहीच नसेल तेव्हा,चला किमान घोटभर चहा घेऊया असं म्हणत कटींग वर कटींग घेतल्या जातात.भटवाडीत अक्षय हॉटेल आमचा अड्डा होता,आमची ठेक,संध्याकाळी सगळे तिथं पडलेले असायचो.पोरं सतरा अठरा पण ‘चार’ में ‘दस’ कर तेही कटींग मध्ये,पाच में बारा.असं म्हणत सगळेच हाफ कटींग मध्ये फूल चहा पुरवून घ्यायचे.त्या हॉटेलचा कोपरा आमच्यासाठी रिझर्व असायचा.तासनतास नुसत्या चकाट्या,हे आमचं त्यावेळचं फेसबुक व्हाटसेप होतं.तिथ एका भाईचा गेम झाला,आमचाही आशियाना उजाडला.
चहा आणि बनमस्का
हॉटेल बरीच वर्षे बंद राहिलं.नंतर मजा गेली.मित्रांची पांगापांग झाली.
सोबत असणारे नवी ठेक शोधत असतातच,मग भटाचा चहा कडे वळलो.
चहा काही सुटत नव्हता,इथच समोर मित्राचं दुकान होतं,भटाच्या बाजूला वडापाववाला,
चहा आणि वडापाव मुंबईचं समीकरण.नंतर दुकानातच सगळं यायला लागलं.
एका चहा नवसारीचा आठवतो.वापीला गेलेलो तेव्हा.
प्रचंड थंडी पण उकळता चहा हातात घेऊन भुरके मारत पिण्याची मजा येत होती.
तेवढ्यापुरते मग थंडीवाजायची कमी वाटायची.काळा चहा कधी प्यायलो नाही.
खूप वर्षे दुधाच्या चहावर असल्याने काळा चहा तोंडात धरवत नसायचा.
एकदा वडलांनी हॉटेलात चहा पाजलेला.त्याची चव फारच कमी ठिकाणी चाखायला मिळाली.
इराणी हॉटेल असावं ते,आणि मग इराणी हॉटेलात जायची सवयच लागली खास चहा आणि बनमस्का साठी.
त्या चवीशी मिळती जुळती चव घाटकोपर रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर च्या स्टॉलवर मिळाली
पण फार काही जवळ जाणारी वाटली नाही.
इराणी हॉटेलातला चहा बेस्ट
मुंबईत चहाचे अनेक प्रकार आहेत.इराणी हॉटेलातला चहा, भटाचा चहा,राजस्थानी मारवाडी लोकानी पितळेच्या टोपात सतत वगराळे फिरवून फिरवून केलेला,नागोरी चहा चहाचं मार्केटिंग नव्हतं तेव्हाही हे लोक आपला चहाप्रेमी वर्ग टिकवून होते,आहेत.नंतर वेगवेगळे ब्रॅंड यात उतरले.एक ब्रॅंड चहा मी पुण्यात प्यायलो अक्षरश: चहा मसाला टाकून केलेला त्यात बाकी काहीच नव्हतं.एव्हरेस्ट चहा मी अनेकदा प्यायलो असल्याने मला ती चव नीटपणे लक्षात होती.मुंबईत चहा आणि सुट्टा (सिगारेट) हे समीकरण आहे.
त्यावेळचे काही चहाचे ब्रॅंड – ताज महल चहा. वाह उस्ताद वाह वाला ,आता तो ऐकिवात नाही. रेडलेबल चहा,कडक चहा,वाघ बकरी चहा,लीप्टन चहा,गिरनार चहा,सोसायटी चहा,आसाम चहा,असे अनेक ब्रॅंड त्यावेळी सुरू होते,यातले काही विस्मृतीत गेले.चहा दिवसातून कितीहीवेळा होत असे.चहाला कधी नकार द्यावासा वाटला नाही.परंतु मध्यंतरी भयंकर एसिडिटी झाली त्यामुळे चहा कायमचा बंद झाला.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)