भाजपा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यास , मी जीव देईन अशी धमकी देणाऱ्या 38 वर्षीय ट्रकचालकाचा बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा आत्महत्येचा प्रकार असावा असे कळते. किनगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अहमदपूर-अंधोरी मार्गावर बोरगाव पाटीजवळ रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. सचिन कोंडीबा मुंडे (वय 38, रा. येस्तर, जि. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर) असे मृताचं नाव आहे.
‘पंकजा मुंडे पराभूत झाल्यास जीव देणार’ अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा बस अपघातामध्ये मृत्यू
ज्या बसमुळे अपघात घडला त्या बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हा अपघात होता की आत्महत्या याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही बस बोरगाव पाटी जवळ ‘यलदारवाडी नाईट हॉल्ट’ येथे थांबली होती,त्यावेळी रिव्हर्स घेताना हा प्रकार घडला असल्याचे समजते. सचिन मुंडे बसच्या पाठीमागे उभा होता आणि जेव्हा बस रिव्हर्स मध्ये मागे येत होती,त्यावेळी बसखाली चिरडून अपघातात सचिन मुंडेचा मृत्यू झाला.मात्र मुंडेंचा मृत्यू अपघातामुळे झाला की ही आत्महत्या होती, याचा तपास सुरू आहे. अशी माहिती किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी दिली असून तपासाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जप्त करण्यात आली आहे.
“जर पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर मी जिवंत राहणार नाही.”
मृत सचिन मुंडे हा अविवाहित असून तो आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता.त्याला एक भाऊ आहे. त्याने एक व्हिडीओ प्रसारित केला होता.
या व्हिडिओ मध्ये त्याने म्हटले होते की, “जर पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर मी जिवंत राहणार नाही.” त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
भाजपच्या पंकजा मुंडे यांचा काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांनी 6,553 मतांनी पराभव केला आहे. बीडची लढत अतिशय चुरशीची झाली होती.
इथं रात्री उशीरापर्यंत याठिकाणी मतमोजणी सुरू होती.
याशिवाय कायदासुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाल्याने इथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अखेर 4 जून रोजी रात्री उशीरा निवडणूक आयोगाकडून बीडचा निकाल जाहीर करण्यात आला होता.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 09,2024 | 12: 22 AM
WebTitle – Supporter Who Vowed to Die If Pankaja Munde Lost Election Dies in Bus Accident