नवी दिल्ली: सावरकर यांच्या जयंती च्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे सावरकर जयंती साठी हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आल्याचे समोर आले आहे.यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निषेध व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी सोशल मिडिया मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर ट्विट करत म्हटलंय की,सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी ! आज नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी आहे.
ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेण-गोळे सहन करून मोठा त्याग केला व ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना! मला या लोकांच्या बुद्धीची कीव येते! अहो आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय ! जाहीर निषेध ! ⚫
बहुजन समाजातील महामातांचे पुतळे हटवल्याने आता नव्या वादाला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे.
आयेशा-तुषार ने UPSC परीक्षेत केली फसवणूक यूपीएससीने दिली सर्व माहिती
राहुल गांधी चे भारतीय नागरिकत्व रद्द करा; ब्रिटिश नागरिक?
संसद उद्घाटन वाद;मायावती यांचा विरोधकांपेक्षा वेगळा सूर
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 29, MAY 2023, 13:25 PM
WebTitle – Statues of Savitribai Phule and Ahilya Devi Holkar removed for Savarkar Jayanti