श्रीलंका : बौद्ध धम्मात हत्ती या प्राण्याला अनन्यसाधारण महत्व आहे.बौद्ध धम्मात नालागिरी हत्ती ची कथा प्रसिद्ध आहे.अशाच एका गजराजाचं ,नंदुगमुवा राजा (Nadungamuwa Raja) चं निधन झाल्याने श्रीलंकन लोकांनी शोक व्यक्त केला.नंदुगमुवा राजा हा हत्ती संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध होता.शेकडो लोक या हत्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते.सोमवारी (Srilanka) श्रीलंका देशातील सर्वात पवित्र (महत्वाच्या) हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर श्रीलंकेतील अधिकार्यांनी सरकारी इतमामात अंत्यसंस्काराचे आदेश दिले आहेत, तसेच असे म्हटले आहे की या हत्तीचे अवशेष जतन केले जातील.
लोक या हत्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते.
श्रीलंका मधील नंदुगमुवा राजा चं वैशिष्ट्य
कोलंबो जवळ वयाच्या 68 व्या वर्षी मरण पावलेला नदुंगमुवा राजा (Nadungamuwa Raja) हा आशियातील सर्वात मोठा हत्ती मानला जात होता.त्याची उंची 10.5 फूट होती. नदुंगमुवा राजा ने अनेक बौद्ध धार्मिक कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच्या जीवनकाळात सर्वात प्रसिद्ध हत्तींपैकी एक होता.श्रीलंकेत त्याला राजेशाही थाट होता.
बौद्ध धार्मिक सोहळ्यात त्याच्या पाठीवर एक अवशेषांची पेटी ठेवली जायची ज्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचा दात ठेवलेला असायचा.(the holy tooth relic of lord Buddha) या हत्तीला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं होतं.त्याचं महत्व एवढं विशेष होतं की तो रस्त्यावरून जात असताना श्रीलंकन सरकारकडून त्याला चारी बाजूने सशस्त्र सुरक्षा पुरवली जात असे.आपल्याकडील झेडप्लस सुरक्षेप्रमाणे.
नंदुगमुवा राजा या हत्ती चा जन्म भारतात झाला होता
नंदुगमुवा राजा चा जन्म १९५३ साली भारतात झाला होता,मैसूर संस्थानाने हा हत्ती श्रीलंकेला भेट दिला होता.
म्हैसूरच्या राजाने श्रीलंकेच्या बौद्ध भिक्खू ना भेट दिलेल्या हत्तीच्या दोन बछड्यांपैकी एक नंदुगमुवा राजा हा हत्ती होता.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी वाहिली आदरांजली
“हत्तींचा राजा, ज्याचा देश-विदेशातील लोक अनेक वर्षांपासून आदर करत होते. बोधी दंत विहारातील (बुद्धाचा दात असलेले विहार) पवित्र कोशाच्या सन्मानार्थ केलेल्या उदात्त कृतीच्या प्रेरणेसाठी, त्यास महान निर्वाण प्राप्त व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाने सांगितले की राष्ट्रपतींनी टस्करचे शरीर भावी पिढ्यांसाठी जतन करण्याचे निर्देश दिले आहेत.
बौद्ध धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार
नंदुगमुवा राजा वर बौद्ध धम्माच्या धार्मिक पद्धतीनुसारच अंत्यसंस्कार होणार असून त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर जतन करण्यासाठी ते संबंधित शिल्पकारांकडे (taxidermist) सुपूर्द केले जाणार आहे.द गार्डियन ने दिलेल्या वृत्तानुसार,या गोष्टीसाठी केवळ विशिष्ट शारीरिक गुणधर्म असलेल्या हत्तींचीच निवड केली जाऊ शकते, असा परंपरागत आदेश आहे, या हत्तींची पाठ सपाट, विशेष वक्र दात असणे आवश्यक आहे आणि जेव्हा ते उभे राहतात तेव्हा हत्तीचे सर्व सात बिंदू – त्यांचे चार पाय, सोंड, जननेंद्रिय आणि शेपूट – जमिनीला समांतर असणे आवश्यक आहे.
जयमंगल अठ्ठ गाथेमध्ये उल्लेख असणारा नालागिरी हत्ती
जयमंगल अठ्ठ गाथा या बौद्ध साहित्यातील अठ्ठ गाथेत तिसरी गाथा आहे.ज्यामध्ये अशा भव्य नालागिरी हत्ती चा उल्लेख येतो.
ही गाथा विजयाचे प्रतिक म्हणून लिहीली गेली आहे.
नालागिरी गजवरं अतिमत्तभुतं,दावाग्गि चक्कमसनीव सुदारूणन्तं ॥
मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि ॥
अर्थ : ज्या मुनीन्द्राने, दावाग्निचक्र आणि वीजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत्त अशा नालागिरी हत्तीला
आपल्या मैत्रीरूपी पावसाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण होवो.
नालागिरी हत्ती ची कथा
एकदा तथागत भगवान बुद्ध सकाळी चिवर परिधान करून भिक्षाटणासाठी निघाले असता देवदत्ताने अजातशत्रूच्या नोकराकरवी हत्तीशाळेतला ‘नालागिरी’ नावाचा हत्ती तथागताला मारण्यासाठी भर रस्त्यावर सोडला.महाभयंकर रागीट खवळलेला हत्ती भगवान बुद्धांच्या दिशेने रागाने जोरात ओरडत चालला होता. नगरीतले लोक घाबरले होते. तथागत भगवान बुद्ध मात्र धीर-गंभीर पाऊले टाकत रस्त्याने चालले होते. लोक ओरडत होते, तथागत आपण तिकडे जाऊ नका ! हा मातलेला उन्मत्त हत्ती आहे.असे लोक आर्जव करू लागले.
परंतु तथागत निर्भयपणे आणि विचलित न होता अगदी शांतपणे पुढे चालत राहिले. त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नव्हती, कारण ते दहा बळांनी युक्त होते. रोज प्राणीमात्रांसंबंधी मैत्री भावना करणारे होते. त्यांच्याकडे अथांग करुणा होती. हत्ती धावत जवळ येताच, तथागतांनी आपला एक हात वर केला आणि हत्तीला म्हणाले “नालागिरी, शांत हो” असे म्हणताच नालागिरी जाग्यावर थांबला,त्याच्या मुखावर तथागतांनी मायने प्रेमाने गोंजारत त्याला शांत केले.नालागिरी जवळ येऊन भगवंताचे चरण गोंजारु लागला. तथागतांच्या वाणीत ताकद होती. भगवान बुद्धाचा हा महान विजय होता.
तर वाचनीय लेख/अपडेट्स
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 15, 2022 12: 12 PM
WebTitle – Sri Lanka: Asia’s most famous elephant king Nandugamuwa dies