युपी,लखीमपूर दि 08 : युपीत सध्या पंचायत समितीची (ब्लॉक प्रमुख) निवडणूक सुरू आहे. सुमारे 825 पंचायत समितींसाठी ही निवडणूक होते आहे.आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.मात्र आजच्या दिवशी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी हिंसेच्या तसेच महिलांशी गैरवर्तन करण्याच्या घटना घडल्याचे समजतेय.महिलेच्या पदराला हात घालण्यात आल्याची घटना लखीमपूर मध्ये घडली आहे.
उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षातील महिला उमेदवाराशी गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत असून चित्रपटातील बाहुबली गुंड लोकांच्या सीन प्रमाणे युपीत सध्या चित्र दिसत असल्याचे दिसतेय.
अर्ज भरण्यासाठी जात असताना महिलेला गेटवरच रोखण्यात आल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत असून महिलेच्या पदराला हात घालून रोखण्यात आले. तसेच मारहाण देखिल करण्यात आली असा आरोप करण्यात येत आहे.अखेर या महिलेला अर्ज भरताच आला नाही अशीही माहिती मिळत आहे.म्हणजे तिला अर्जच भरू न देण्यात गुंड यशस्वी झाल्याचे चित्र युपीत पाहायला मिळत आहे.
दु:खद आणि चिंताजनक गोष्ट म्हणजे पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका निभावली असा आरोप करण्यात येत आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे युपीचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट अर्थात योगी यांचे गुंड असल्याचा आरोप करत सत्ता के भूके योगी के गुंडे म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 8, 2021
भाजपचे हे समर्थक भाजप पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व खासदार रेखा वर्मा यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे.
ही घटना समोर आल्यानंतर कॉँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी
आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ
उर्फ अजयकुमार बिष्ट आणि भाजप पक्षावर जोरदार टीका केली आहे.
उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
प्रियांका गांधी यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.पीएम साहेब आणि सीएम साहेब यासाठीही शुभेच्छा द्या की उत्तर प्रदेशात तुमच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बमबाजी,गोळीबार आणि दगडफेक केली आहे.पत्रकारांना मारहाण केली आहे. तसेच महिलांसोबत गैरवर्तन केले आहे.अनेक ठिकाणी अर्ज लुटून नेले आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी बांधून लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू आहे.अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.
पीएम साहब और सीएम साहब इसके लिए भी बधाई दीजिए कि
यूपी में आपके कार्यकर्ताओं ने
⭐कितनी जगह बमबाजी, गोलीबारी, पत्थरबाजी की
⭐कितने लोगों का पर्चा लूटा
⭐कितने पत्रकारों को पीटा
⭐कितनी जगह महिलाओं से बदतमीजी कीकानून व्यवस्था की आंख पर पट्टी बांधकर, लोकतंत्र का चीरहरण चल रहा है। pic.twitter.com/6H9L390frB
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 8, 2021
उत्तरप्रदेशातील सिद्धार्थ नगर,संत कबीर नगर,लखीमपूर,पिलीभीत,एटा,सीतापुर,उन्नाव,रायबरेली, अलीगढ,बदायू ,बुलंदशहर,बीजनौर आदी जिल्ह्यामध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत.
काही ठिकाणी दगडफेक,गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
काही ठिकाणी महिलांशी गैरवर्तन तर काही ठिकाणी उमेदवारांना मारहाण करण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी यासाठी भाजपा ला जबाबदार धरले आहे.
मंदिराजवळ नॉनव्हेज खातो म्हणून तरुणाची हत्या;तपासात समोर आला भलताच प्रकार
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 08, 2021 23 : 35 PM
WebTitle –sp candidate ritu singh’s Sari pulled by bjp workers in up lakhimpur 2021-07-08