बुलंदशहर : दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. कारण आरोपी आफताबने ज्या प्रकारे मुलीची हत्या केली ते आठवून सगळ्यानाच धडकी भरते,व्यक्ती हादरून जाते. श्रद्धा वालकर चा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला नावाच्या प्रियकराने तिचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या भागात फेकले होते. यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर या खून प्रकरणाची चर्चा सुरू झाली.श्रद्धा वालकर हत्याकांडाशी संबंधित असाच एक व्हिडिओ इंटरनेट मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्वत:ला मुस्लिम तरुण म्हणून ओळख सांगणाऱ्या तरुणाने बुलंदशहरचा रहिवासी असल्याचे म्हटले आहे. त्याचे म्हणणे आहे की आफताफचा मूड खराब होता म्हणून त्याने मुलीचे 35 तुकडे केले.दोघांमध्ये भांडण होतं,त्यामुळे 35 काय 36 तुकडे केले असते,काही फरक पडत नाही. व्हिडीओमध्ये स्वत:ला धाडसी समजणारी व्यक्ती राशिद खान नसून विकास कुमार
खरतर हा तरुण ज्या प्रकारे बोलत होता,आणि त्याला अशाप्रकारे प्रश्न विचारले जात होते की जेणेकरून या तरुणामुळे देशातील नागरिकांना मुस्लिम धर्मियांच्या विषयी टोकाचा द्वेष निर्माण होईल.हे सगळं ठरवून केलं गेलं असल्याची लोक चर्चा करत आहेत.”राशिद खान” च्या नावाने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असणारी व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते की, जेव्हा माणसाचा मूड खराब होतो तेव्हा तो त्याचे 35 किंवा 36 तुकडे करू शकतो. जेव्हा त्या व्यक्तीला विचारण्यात आले की त्याने हे प्रशिक्षण कोठून घेतले. तर त्याने यावर उत्तर दिलं की,त्यात काय आहे? फक्त कापत रहा.
‘राशीद खान’ पुढे म्हणतो की, माझे कोणाशी भांडण झाले तर मी त्यालाही कापून टाकेन. मला अनुभव आहे. यानंतर, त्याला विचारले जाते की तो कुठे राहतो, तेव्हा तो तरुण “राशिद खान” सांगतो की तो बुलंदशहरचा रहिवासी आहे. मग त्याला त्याचे नाव विचारले जाते, तेव्हा तो राशिद खान सांगतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागला.हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो पोलिसांपर्यंत पोहोचला. यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी पाऊले उचलतात यंत्रणा कामाला लागते. आणि या तथाकथित “राशिद खान” ला अटक करण्यात येते. यानंतर समोर येणारे सत्य सर्वांच्यानाच धक्का देणारे ठरते. व्हिडीओमध्ये स्वत:ला धाडसी समजणारी व्यक्ती रशीद खान नसून विकास कुमार आहे. बुलंदशहर पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलीस अधीक्षक या प्रकरणाची माहिती देत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीत बनवलेला एक व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला,
ज्यामध्ये स्वतःला बुलंदशहरचा रहिवासी सांगणाऱ्या एका व्यक्तीने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
समोर आलेल्या आरोपीला सिकंदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच स्वत:ला “राशिद खान” म्हणून ओळख सांगणारा चौकशीत विकास कुमार निघाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिस अधीक्षक म्हणतात, “दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला. त्यात स्वत:ला रशीद म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या संदर्भात सिकंदराबाद पोलिस स्टेशन गुंतले होते, याचा शोध घेण्यासाठी या व्यक्तीला आज ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने आपले नाव विकास कुमार असल्याचे सांगितले आहे. यापुढे त्याद्वारे आक्षेपार्ह शेरेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षकांचे म्हणणे आहे.
शिक्षणा संबंधी जनजागरणासाठी पहिली शिक्षण महापरिषद कागलमध्ये – प्रा. किरण भोसले
पुन्हा सुटकेस कांड : आयुषी चौधरी चा खून करून शव सुटकेस मध्ये फेकलं
hraddha Murder Case दोन दिवस मृतदेहाचे तुकडे करत होता आफताब, श्रद्धा मर्डर केस
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 25,2022, 15:13 PM
WebTitle – Shraddha Walker murder case: Rashid Khan aka Vikas Kumar arrested by police