फ्रान्स, दि 08 : सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा ताईन-एल’हर्मिटेज शहरात नियोजित दौरा होता.यावेळी ते बॅरिकेट्स लावलेल्या भागातून चालताना दिसतात.उपस्थित लोकांना ते अभिवादन करत असताना एका व्यक्तीने हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या व्यक्तीशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला,त्याचवेळी या व्यक्तीने इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा हात पकडून जवळ ओढले आणि कानाखाली मारली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती फ्रेंच माध्यमांनी दिली आहे.
राष्ट्राध्यक्षांना कानाखाली मारताच “डाउन विथ मॅक्रॉन-इजम” अशी हल्लेखोराने घोषणा दिली.
फ्रान्स मधिल राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे
प्रधानमंत्री जीन कॅस्टेक्स यांनी लवकरच नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना म्हटले की “लोकशाही म्हणजे वादविवाद आणि सनदशीर मतभेद “याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत हिंसाचार, तोंडी आक्रमकता आणि कमी तीव्रतेचा शारीरिक हल्ला असा त्याचा अर्थ होत नाही”
अती डाव्या विचारांचे नेते जीन-ल्यूक मलेन्चॉन यांनी कानाखाली मारल्यानंतर लगेचच राष्ट्रपतींवरील या हल्याचा निषेध करत सहवेदना व्यक्त केली.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सध्या फ्रान्सचा दौरा करत आहेत
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सध्या फ्रान्सचा दौरा करत आहेत ,त्यांनी नुकतीच ताईन-ल हर्मिटेजमधील हॉटेलच्या स्कूलला भेट दिली होती.
मंगळवारी त्यांचा हा दौरा सुरूच ठेवण्यात आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्राध्यक्षांची ही भेट फ्रेंच बार आणि रेस्टॉरंट्ससाठी महत्त्वाची मानली जातेय, सात महिन्यांच्या लॉकडाउन नंतर बार आणि रेस्टॉरंट ग्राहकांसाठी उघडली जात आहेत.यासोबतच फ्रान्सच्या रात्रीच्या कर्फ्यूही बुधवारी 21:00 ते 23:00 पर्यंत करण्यात आला आहे.
जॉर्ज फ्लॉयड च्या मुलीसमोर राष्ट्राध्यक्ष क्षमायाचना करताहेत? फॅक्ट चेक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)