महाड : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांचा सोमवारी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी रायगडावरील (raigad fort ) प्रस्तावित दाै-याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर हाेळीचा माळ येथे राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवले जाणार आहे.मात्र होळीचा माळावर हेलिकॉप्टर उतरु दिले जाणार नाही असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.शिवप्रेमींच्या या पवित्र्यामुळे आता वातावरण तापायला लागले आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन आता कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या अगोदर रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते.
या हेलीपॅडवर जेव्हा एखादे हॅलिकॉप्टर उतरत असे किंवा उड्डाण करत असे तेव्हा मोठ्या प्रमाणात धूळ, माती आणि केर-कचरा उडत असे.
ही धूळ, माती होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने
एक प्रकारे महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा अवमान केल्याचा प्रकार घडत होता.
या अगोदर शिवप्रेमींनी प्रशासनाला हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यास भाग पाडले होते
१९९६ साली काही शिवप्रेमींनी उपोषण करून प्रशासनाला हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यास भाग पाडले.त्यानंतर इथे आजतागायत कोणतेही हेलिकॉप्टर उतरले नाही.मात्र सुमारे २५ वर्षांनंतर आता शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे, असे शिवप्रेमींना वाटत आहे. म्हणूनच शिवप्रेमींकडून रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर माळावर उतरवण्याला कडाडून विरोध केला जात आहे.त्यामुळे काेणत्याही परिस्थितीत हेलिकॅप्टर उतरविण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी शिवप्रेमींनी प्रशासनास केली आहे.
याआगोदर देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी रायगडावर हेलिकॉप्टर उतरविले गेले होते.
मात्र त्या त्या वेळी होळीच्या माळावरील पुतळ्यावर मोठ्या प्रमाणावर माती व धुळीचे कण उडाल्यामुळे
नाराज शिवप्रेमीनी हेलिपॅड उखडून टाकले होते.
त्यानतंर आता पुन्हा राष्ट्रपतींकरीता हेलिपॅड बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामुळे शिवप्रेमीनी पुन्हा विरोध केल्याने तणाव निर्माण झाला आहे.
पुन्हा २५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने
आम्हा सर्व शिवप्रेमींचा हाेळीचा माळ येथे हेलिकाॅप्टर उतरविण्यास विरोध असल्याचे नितीन पावले,सिद्धेश पाटेकर यांनी नमूद केले.
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
निवास व्यवस्था,प्रवासखर्चावर लाखोंचा खर्च;अनुसूचित जातीच्या निधीतून
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 03, 2021 23: 21 PM
WebTitle – Shivpremi opposes landing of President’s helicopter at Raigad