पंजाब : शिवसेना नेते सुधीर सूरी यांची शुक्रवारी पंजाबमधील अमृतसरमध्ये पोलिसांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. Shiv Sena leader Sudhir Suri was killed in front of the police in Amritsar, Punjab on Friday. आरोपी मारेकरी संदीपला पोलिसांनी अटक केली. या हल्ल्यानंतर पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. विरोधी पक्षांनीही सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारवर निशाणा साधला आहे.दुसरीकडे खलिस्तान समर्थक नेता गोपाल चावला चा एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत असून यात त्याने सदर हत्येचे उघड समर्थन केले आहे.
पोलीस संरक्षण असूनही हल्ला यशस्वी
पंजाबमधील अमृतसर शहरात शुक्रवारी दुपारी शिवसेना नेते सुधीर सूरी (shivsena leader Sudhir Suri) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका निदर्शनादरम्यान सुरी यांना रस्त्यावर गोळ्या घालण्यात आल्या. ते एका मंदिराबाहेर आंदोलन करत होते. हल्ल्यादरम्यान अनेक राऊंड गोळीबार झाल्याची चर्चा आहे. स्थानिक शिवसेना नेते सुरी हे एका मंदिरात व्यवस्थापनाच्या वादावरून आंदोलन करत असताना एका दुकानदाराने त्यांच्यावर किमान पाच गोळ्या झाडल्या. त्याना पोलीस संरक्षण असूनही हल्लेखोर त्याना लक्ष्य करण्यात यशस्वी ठरला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सुरी यांचा मृत्यू झाला.

हल्लेखोराला अटक,शांतता राखण्याचे आवाहन
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यावर सध्या आमचे लक्ष आहे. तपासात ज्या काही गोष्टी समोर येतील, त्या शेअर केल्या जातील. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सुरी आणि त्याच्या साथीदारांचा आज मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित लोकांशी वाद झाल्याचे कळते. ते एका सहकाऱ्यासह रस्त्यावर शांततेत धरणे धरत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
अनेक राजकीय नेते निशाण्यावर
शिवसेना नेता सुधीर सूरी (shivsena leader Sudhir Suri) वर भरदिवसा गोळ्या झाडल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. युद्धानंतर आता पाकिस्तानात बसलेले खलिस्तान समर्थक नेता गोपाल चावला (Gopal Singh Chawla video) याने त्याचा व्हिडिओ जारी केला आहे. शिवसेना नेते सुधीर सूरी यांच्या मारेकऱ्याचे अभिनंदन करताना गोपाल चावला ने ही हत्या करणाऱ्या शीख तरुणांसाठी आमचे प्राणही बलिदान असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे पंजाबमधील अनेक राजकीय नेते निशाण्यावर असून त्यांचा नंबरही लागणार असल्याचा दावा गोपाल चावला ने या व्हिडिओ मध्ये केला आहे.यामुळे एकच खळबळ माजली असून हा व्हिडिओ सोशल मिडियात मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.
कोण आहे गोपाल चावला ?
खलिस्तान समर्थक गोपालसिंग चावला (Gopal Singh Chawla) हा अनेक दिवसांपासून पाकिस्तानात राहत आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही त्याचा सहभाग आढळून आला होता. तो दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा मानला जातो आणि हाफिजसोबतच्या फोटोतही तो दिसत होता. करतारपूर कॉरिडॉरसाठी पाकिस्तानने स्थापन केलेल्या वाटाघाटी समितीमध्ये गोपाल सिंग चावला याचेही नाव होते. भारत सरकारने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती, त्यानंतर पाकिस्तानने चावलाला समितीतून काढून टाकले होते.
सुधीर सूरी वर हल्ला करणारा हल्लेखोर कोण?
हल्लेखोर संदीप सिंग हा अमृतसरचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो कपड्यांचे दुकान चालवतो करतो.
संदीप सिंग उर्फ सनी हा कट्टरपंथी शीख तरुण आहे. तो ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा कार्यकर्ता आहे.
ही एक कट्टरपंथी शीख संघटना आहे.त्याने नुकतीच संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यासह नेत्यांची भेट घेतली होती. पोलीस चौकशीत हल्लेखोर संदीपने शिवसेना नेत्याची हत्या कोणत्याही संघटनेच्या सांगण्यावरून झाल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची कार जप्त केली असून त्यामध्ये खलिस्तानींचे पोस्टर आढळून आले आहेत.
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on NOV 05,2022, 12:34 PM
WebTitle – shiv-sena-leader-sudhir-suri-killed-in-front-of-the-police in punjab