नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात एका मुस्लिम व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारला आहे. शेख जफर (Jafar Shaikh) असे या व्यक्तीचे नाव आहे. मात्र, धर्म बदलल्यानंतर ही व्यक्ती आता चैतन्य सिंग राजपूत (Chaitaniya Singh Rajput) या नावाने ओळखली जाणार आहे. शेख यांनी शुक्रवारी मंदसौर येथील पशुपतीनाथ मंदिराच्या (Pashupatinath Mandir Mandsaur) आवारात विधिवत हिंदू धर्म स्वीकारला. त्यांचा जन्म मंदसौरच्या गरोथ भागात झाला. यावेळी स्वामी महामंडलेश्वर चिदंबरानंद महाराज आणि खासदार सुधीर गुप्ता, आमदार यशपाल सिसोदिया हेही उपस्थित होते.मात्र राजपूत समाजातील काही लोक या धर्मपरिवर्तनाने नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
यावेळी धर्म बदलणारे शेख म्हणाले की, भारतात प्रत्येकजण सनातनी आहे. मी पण आहे, आज मी पूर्णपणे सनातनी झालो आहे. मला बरे वाटत आहे. मुस्लिम धर्मगुरू याला विरोध करतील की नाही, असे विचारले असता शेख म्हणाले की, त्यांनी विरोध केला तर चांगली गोष्ट होणार नाही. माझ्या श्रद्धेचा प्रश्न आहे. प्रत्येकाला त्यांच्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे. हा देश स्वतंत्र आहे आणि येथील लोकही स्वतंत्र आहेत. ज्यांना जो धर्म मानायचा आहे तो धर्म त्याला मानण्याचे स्वातंत्र्य आहे. ही वैयक्तिक बाब आहे.
शेख म्हणाले की, माझी पत्नी शारदा हिंदू आहे. आम्हाला मुले नाहीत. माझा मोठा भाऊ आणि दोन लहान बहिणी मुस्लिम आहेत.” शेख जफर म्हणाले, “मी लहानपणापासून मंदिरात जायचो. माझ्या घरी एक मंदिर आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, माता, महादेव आणि बजरंग बली यांच्या मूर्ती आहेत.
अगोदरपासून हिंदू धर्माकडे कल
शेख यांची हिंदू धर्मावर पूर्वीपासूनच श्रद्धा असल्याचे शेख यांना धर्मांतरित करणाऱ्या हिंदू पुजाऱ्यांनी सांगितले. त्यांचा हिंदू देवी-देवतांवर विश्वास होता. हिंदू सण साजरे करायचे. त्याने आपल्या घरात एक मंदिरही बांधले होते ज्यात तो पूजा करत असे. वास्तविक, शेखने दहा वर्षांपूर्वी एका हिंदू मुलीशी लग्न केले होते आणि तेव्हापासून त्यांचा कल हिंदू धर्माकडे होता.
आज स्वामी चिंदबरानंदजींच्या मार्गदर्शनाखाली मी मुस्लिम धर्मातून हिंदू धर्माची दीक्षा घेतली आहे. आजपासून मला चेतन सिंग राजपूत या नावाने ओळखले जावे.अशी पोस्ट जफर शेख यांनी सोशल मिडियात शेअर करत आपल्या धर्म परिवर्तनाची माहिती दिली.
राजपूत लोकांचा मात्र विरोध
कुंवर महेंद्र सिंह राठोड यांनी म्हटलं की,”जेव्हा तुमचं धर्मांतर करणारे ब्राह्मण आहेत तर तुम्हाला ब्राह्मण बनलं पाहिजे,
ते क्षत्रिय किंवा राजपूत बनता येत नाही, ते चांगल्या कर्माचे फलस्वरूप जन्माला येतात.”
पेशाने वकील असणाऱ्या गोविंद चौहान यांनी म्हटलं,”तुझी ऐसी की तैसी आला मोठा राजपूत बनायला, तुझ्या प्रवेशाने समाज दुखावला गेला आहे, त्याचे प्रायश्चित तुलाच करावे लागेल.”
“समाज तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही,ज्यांनी तुम्हाला राजपूत बनवलं त्या स्वामी खुर्दारानंद त्यांच्यावरही आम्ही बहिष्कार टाकू”
महरौड़ साहब नावाच्या व्यक्तीने म्हटलंय,”या व्यक्तीला हिंदू का बनवले नाही, ब्राह्मण, बनिया, हरिजन, कायस्थ का केले नाही? भाऊ, प्रत्येकाला क्षत्रियच बनायचं आहे,खैरात वाटली जातेय”
यामुळे राजपूत समाज नाराज असल्याचे दिसून येत असून आज ट्विटरवर #क्षत्रिय_हिंदू_नहीं असा ट्रेंडही सुरू झाला आहे.
रामराज्य या हँडलवरून असं म्हटलं गेलंय,”हे अजिबात मान्य नाही, कारण एकदा राजपूत आपला क्षत्रिय धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेला की तो किंवा त्याचे वंशज पुन्हा क्षत्रिय धर्मात परत येऊ शकत नाहीत. परंतु ज्याला हिंदू व्हायचे आहे तो जैन, बौद्ध, शीख इत्यादी वैदिक आर्य धर्म सोडून हिंदू होऊ शकतो.
एकूणच या घटनेवरून हिंदू धर्मात धर्म परिवर्तन करून जाणे आता अडचणीचे असल्याचे दिसत असून अशा व्यक्तीला नेमकी कोणती जात दिली जाईल यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण असे प्रत्येक जातीतील व्यक्ती विरोध करण्यास पुढे येत आहेत.त्यामुळे ही घरवापसी आता अडचणीची ठरताना दिसत आहे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
हैदराबाद एन्काऊंटर : चकमक बनावट,पोलिसांवर खुनाचा गुन्हा – कोर्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव द्यायला विरोध;मनुवादी जमावाची जाळपोळ
‘हे घर विक्रीसाठी आहे’ आंबेडकरी समाजाने घरांबाहेर लावले बॅनर
MP:दलित वराच्या वरातीवर दगडफेक,सरकारने पाडली बुलडोझरने घरे
विधवा प्रथा : समाज मनाचा दृष्टिकोन अन् मानसिकता बदलली पाहिजे..
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 29, 2022 16:04 PM
WebTitle – Sheikh Zafar converted to Hinduism Chaitanya Singh became a Rajput, opposed by Rajputs