मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाला आहे. देशभरातील विविध श्रेणींमधील २८० प्रकल्पांमधून परीक्षकांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमास शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या या प्रारूपाची देशभरात प्रशंसा होत आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने वर्षभर या उपक्रमाचे यशस्वीरीत्या संचालन केले आहे. याच्या माध्यमातून नागरिकांना पाच कोटींहून अधिक लाभ मिळाले आहेत. मागील वर्षी १५ मे रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. महाराष्ट्राच्या या उपक्रमाने ‘स्कॉच’ पुरस्काराच्या नागरिक-केंद्रित प्रशासन या श्रेणीत ८०हून अधिक उपक्रमांना मागे टाकत अंतिम फेरी गाठली आणि पुरस्कार पटकाविला.
सुलभ आणि जलद सेवेचे उत्तरदायित्व
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावली आहे.
प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर याउपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करून राज्यभर एक समर्पित टीम तयार करण्यात आली आहे.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाने सार्वजनिक सेवा वितरणात देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केले. तसेच हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी संलग्न असून प्रशासनात सुलभ आणि जलद सेवेचे उत्तरदायित्व निर्माण केले, असे डॉ. अमोल शिंदे यांनी सांगितले. ‘स्कॉच’ पुरस्कार वितरण सोहळा ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
SKOCH पुरस्कार संदर्भात माहिती
एका खाजगी संस्थेकडून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.SKOCH पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे,असा या संस्थेचा दावा आहे. हे पुरस्कार भारताला एक प्रगतीशील राष्ट्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, प्रकल्प आणि संस्थांना मान्यता देतात. २००३ मध्ये स्थापन झालेला हा पुरस्कार डिजिटल, वित्तीय आणि सामाजिक समावेशन क्षेत्रातील उत्तम कार्यांचा सन्मान करतो. अलीकडेच, आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन (DAY-NULM) या प्रमुख मिशनला, त्यांच्या पोर्टल फॉर अफोर्डेबल क्रेडिट अँड इंटरेस्ट सबवेंशन एक्सेस (PAiSA) यासाठी प्रतिष्ठित SKOCH गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.
SKOCH पुरस्कार हे एक स्वतंत्र संस्था प्रदान केलेले देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे, ज्यामध्ये भारतासाठी अतिरिक्त प्रयत्न करणाऱ्या योगदानांचा सन्मान केला जातो. २००३ मध्ये स्थापन झालेला हा पुरस्कार डिजिटल, वित्तीय आणि सामाजिक समावेशनाच्या क्षेत्रात योगदान देतो.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 30,2024 | 16:36 PM
WebTitle – Shasan Aplya Dari Initiative Wins Prestigious SKOCH Award for Maharashtra Government
#SKOCHAward #SKOCH