(Air India urinate Case) एअर इंडियाने तब्बल एक महिना दडवले असा आरोप असणारे विमानात महिलेवर लघवी करण्यात आल्याचे प्रकरण एक महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर सोशल मिडिया मध्ये तीव्र स्वरूपात ते गोदी मिडियात तोंड देखले प्रकारे चर्चेत राहीले आहे.सोशल मिडियात यावर सभ्य नागरिकांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.एअर इंडिया लघवी प्रकरणातील आरोपीची ओळख उघड झाली आहे. आरोपी शंकर मिश्रा हा अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नसून मात्र त्याच्या कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकले असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी आरोपी शंकर मिश्रा विरोधात लुक आउट नोटिस जारी केली आहे
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये (Air India urinate Case) महिला सहप्रवाशासोबत गैरवर्तन करणाऱ्या मुंबईस्थित शंकर मिश्रा याला त्याच्या कंपनीने (Wells Fargo) नोकरीतून काढून टाकले आहे. एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघवी करणाऱ्या व्यक्तीचं नाव शंकर मिश्रा असे आहे. 34 वर्षीय शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो (Wells Fargo shankar mishra ) नावाच्या कंपनीत उपाध्यक्ष म्हणून काम करत होता. या घटनेनंतर कंपनीने एक निवेदन जारी करून हे कृत्य अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलंय.
वेल्स फार्गो (Wells Fargo) यांचं निवेदन
वेल्स फार्गो (Wells Fargo) यांनी एक निवेदन जारी केलं आहे की आम्ही कर्मचार्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक वर्तनासाठी सर्वोच्च मानके ठेवतो. कर्मचार्यांचे असे वागणे अत्यंत त्रासदायक आहे. शंकर मिश्रा यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आम्ही त्यांना नोकरीतून बडतर्फ करत आहोत. उल्लेखनीय म्हणजे, 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानात शंकर मिश्रा याने एका महिलेवर लघवी केली होती. (Air India urinate Case) मद्यधुंद अवस्थेत शंकर मिश्रा ने वृद्ध महिलेशी गैरवर्तन केले होते.
लुकआउट नोटीस जारी
महिलेने फिर्याद (Air India urinate Case) दिल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
(Wells Fargo shankar mishra ) तर शंकर मिश्रा या प्रकरणापासून बेपत्ता असून
त्यांच्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बेंगळुरूमध्ये त्याचे शेवटचे ठिकाण पोलिसांना सापडले आहे.या धक्कादायक कृत्यावर सदर महिलेने आपला आक्षेप कंपनी कडे नोंदवला.
30 दिवसांसाठी उड्डाण करण्यास बंदी
या घटनेनंतर शंकर मिश्राने तिची माफी कशी मागितली हे सांगितले, पण या कृत्यामुळे ती इतकी दुखावली गेली की तिला काहीच सुचत नव्हतं तिला त्यानंतर आरोपीच्या जवळ आसपास जायचं नव्हतं, पण एअर इंडियाचे क्रू मेंबर्स तिच्याकडे माफी मागण्यासाठी मिश्रावर दबाव आणत असल्याची माहिती समोर आलीय. एअर इंडिया ला लिहिलेल्या पत्रामध्ये महिलेनं हा संपूर्ण घटना क्रम सांगितला आहे. या घटनेच्या संदर्भात महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिलंय. तब्बल 1 महिन्यानंतर आता आरोपींवर कारवाई सुरू आहे. एअर इंडियाने शंकर मिश्रा ला 30 दिवसांसाठी उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.
शंकर मिश्रा ज्या कंपनीत काम करत होता,त्या कंपनीचे नाव वेल्स फार्गो (Wells Fargo shankar mishra ) असून ती अमेरिकेतील एक मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि तिचं मुख्यालय कॅलिफोर्नियात आहे.शंकर मिश्रा ज्या (Wells Fargo shankar mishra ) मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता, तिथं उपाध्यक्षांला सरासरी वेतन हे ५१ लाख ते ९६ लाखांच्या दरम्यान असल्याचे कळते. एम्बिशन बॉक्सच्या वेतन अहवालानुसार, वेल्स फार्गो च्या अध्यक्ष पातळीवरील सरासरी वेतन या श्रेणीतील आहे. आता मिश्रा ला एवढा प्रचंड पगार मिळत होता तर, त्याला पैशांची मात्र चिंता नक्कीच नसेल.
Alt News मोहम्मद जुबेर यांच्या ट्विटमध्ये कोणताही गुन्हा आढळला नाही
ल्द्वानी Haldwani अतिक्रमण ; नेमकं काय समजून घेऊया
भाजप नेता 13 वर्षीय मुलीवर बलात्कार,संतप्त जमावाने गाडी पेटवली
न करणार? चित्रा वाघ बेस्ट फ्रेंड बनणार?
केतकी चितळे चा राग अनावर, ट्रोलर ला शिवी देत म्हणाली xx
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा,आम्हाला आर्थिक सक्षम बनवा!
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 077,2023 11:18 AM
WebTitle – Shankar Mishra who urinated on a woman on air India flight, fired by Wells Fargo Company