अयोध्या : बेशरम रंग गाण्यावरून देशातील वातावरण तापलं आहे.बॉलिवूड स्टार किंगखान अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या पठाण (Pathan Movie) या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. यूपीमध्ये या चित्रपटाविरोधातील आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्याचबरोबर अयोध्येतील हिंदू साधू महंत यांनी आता पठाण चित्रपटाविरोधात आघाडी उघडली आहे.या पार्श्वभूमीवर नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले अयोध्येचे महंत परमहंस दास पुन्हा चर्चेत आले आहेत.यावेळी त्यांनी बॉलिवूड स्टार किंगखान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan will be burnt alive, threat by mahant paramhans) याला जीवंत जाळणार असल्याची धमकी दिलीय.यासोबतच पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महंत परमहंस दास ने दिला धर्म आदेश
महंत परमहंस दास हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात शाहरुख खानबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. आमचे सनातन धर्माचे भक्त याला सातत्याने विरोध करत आहेत.ते म्हणाले की आज आपण शाहरुख खान चे पोस्टर जाळले, मी त्याचा शोध घेत आहे. फिल्मी जिहादी शाहरुख खान कुठे सापडला तर त्याला जिवंत जाळणार आहे.

यासोबतच परमहंस दास यांनी असेही म्हटले आहे की, बॉलीवूड मधले तीन खान आले आहेत,शाहरुख खान ,सलमान खान, आमिर खान हे तीनही खान मिळून देशात अश्लीलतेची घाण पसरवत आहेत. आणि सतत सनातन धर्माच्या अवलंबीत्व असणाऱ्यांच्या भावनांना दुखावत आहेत. यामुळे आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले आहे. आणि मी धर्मादेश जारी करत आहे.की कोणत्याही चित्रपटात असतील वेबसिरीज मध्ये असतील त्यावर बहिष्कार टाका, माझा धर्म आदेश आहे की कुणीही “पठाण” फिल्म पाहणार नाही.
यावर आता भाजप सरकार काय पाऊले उचलणार आहे याची लोकांना उत्सुकता आहे.
महंत परमहंस दास ना हाऊसअरेस्ट,जलसमाधी वर काय म्हणाले?
संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले – सुबोध भावे
प्रेम किंवा जातीबाहेर लग्न केल्यामुळे दरवर्षी अनेक हत्या – न्या.चंद्रचूड
मनोज गरबडे,शाई फेक ते जामीन,कोर्टात काय झालं? प्रत्येक घडामोड
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण?
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on DEC 21,2022, 11:30 AM
WebTitle – Shah Rukh Khan will be burn alive