अफगाणिस्तान/काबूल : अफगाणिस्तानच्या राजधानीतील शिया बहुल परिसरात मंगळवारी शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करत 3 सिरियल बॉम्बस्फोट झाले.यामध्ये मुलांच्या शाळेत बॉम्बस्फोट झाल्याच्या घटनेत अनेक विद्यार्थ्यांसह किमान सहा नागरिक जण ठार झाल्याची माहिती मिळत असून 11 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर घटनेचे फोटो आणि व्हिडिओ हे अंगावर मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकते त्यामुळे आम्ही ते शेअर करू शकत नाही. जागोजागी फक्त हाडामासांचा खच तुटलेले अवयव आणि शून्य भाव असणारे लहानग्यांचे डोळे मानवतेला प्रश्न विचारत आहेत.पुस्तकांचा खच चप्पल बूट आणि रक्ताचा सडा यामुळे परिसर भयग्रस्त झाला असून लोकांच्या मनात प्रचंड भीतीने घर केल्याचे दिसते.आपल्या भवितव्याचे काय असं विचारणारे डोळे तुम्हाला अवस्थ करू शकतात.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
या साखळी बॉम्बस्फोट संदर्भात काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झद्रान आणि शहराच्या आपत्कालीन रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार,
वेगाने झालेल्या साखळी स्फोटांचा तपास केला जात आहे,
या बॉम्बस्फोटामुळे अधिक जीवितहानी होण्याची भीती वर्तविण्यात आली असून
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय.जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या आत आणि मुमताज एज्युकेशन सेंटरजवळच्या किलोमीटर अंतरावर,
दश्त-ए-बर्चीच्या शिया मुस्लिम बहुल परिसरात हे स्फोट झाले असल्याचे वृत्त आहे.
मुमताज सेंटरमध्ये जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त सध्या नाही.
रक्ताने माखलेल्या शाळेच्या भिंती
दुमजली हायस्कूलकडे जाणार्या अरुंद गल्लीतील रक्षकांनी सांगितले की त्यांनी शाळेच्या आत किमान 10 विद्यार्थ्यांचे मृतदेह पाहिले. असोसिएटेड प्रेस व्हिडिओ च्या पत्रकाराने घटनेचे वर्णन करताना सांगितले की शाळेच्या भिंती रक्ताने माखलेल्या, जळलेल्या अवस्थेतील वह्या पुस्तके आणि मुलांचे बूट पाहून मानसिक धक्का बसला आहे.अनेक सुरक्षा रक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. परिसराला तालिबानने वेढा देत कब्जा केलेला आहे.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहिती नुसार , एका आत्मघाती बॉम्बरने विस्तीर्ण कंपाऊंडमध्ये स्वतःला उडवले,
ज्यामध्ये 1,000 विद्यार्थी बसू शकतात,स्फोटाच्या वेळी शाळेत किती मुले होती हे लगेच स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या घटनेत २० हूनअधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अफगाणिस्तानच्या कट्टर तालिबान शासकांनी सर्व मुलींना शाळेत जाण्याची परवानगी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर
शाळा सहाव्या इयत्तेपर्यंतच सध्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे.
या बॉम्बस्फोटांची तात्काळ कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही.अफगाणिस्तानच्या प्राणघातक इस्लामिक स्टेटच्या संलग्नतेने पूर्वीही या भागाला लक्ष्य केले आहे, जे शिया मुस्लिमांना पाखंडी म्हणून बदनाम करत असतात.तालिबानच्या काळात शिया समुदायाविरुद्ध दहशत आणि हिंसाचार वाढला असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे.या साखळी बॉम्बस्फोटात शाळा, रुग्णालय आणि शिकवणी केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.
ही बातमी इस्लामाबादमधील असोसिएटेड प्रेस पत्रकार रहीम फैझ आणि तमीम अख्गरयांच्या अहवालावर आधारित आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
Amy Wax या युएस प्राध्यापिकेचं ब्राह्मण स्त्री विषयी वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांना आता नीलेश कराळे मास्तर यांचे प्रत्युत्तर..म्हणाले
मशीद भोंगा प्रकरण : सुजात आंबेडकर याना मनसे चं प्रत्युत्तर
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 19, 2022 15:40 PM
WebTitle – Serial bomb blast at a school in Kabul