26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत हिंसाचार झाला.हा हिंसाचार भाजप सरकार पुरस्कृत होता असा गंभीर आरोप – शेतकरी संयुक्त मोर्चा ने केला आहे.
पत्रकार परिषदेत संयुक्त मोर्चाने म्हणले की ,गेल्या 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र आता जनतेसमोर उघड झाले आहे.काही व्यक्ती आणि संघटना (मुख्यत: दीप सिद्धू आणि सतनामसिंग पन्नू यांच्या नेतृत्वात किसान मजदूर संघर्ष समिती) च्या पाठिंब्याने सरकारने हे आंदोलन हिंसक केले. संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा स्पष्ट करत आहे की लाल किल्ला आणि दिल्लीच्या इतर भागात हिंसक कारवायांशी आमचा काही संबंध नाही. आम्ही त्या घटनेचा तीव्र निषेध करतो.
शेतकरी संयुक्त किसान मोर्चा मधील नेत्यानी म्हटले की,आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या क्रौर्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलिस व इतर एजन्सींचा वापर करून हे आंदोलन संपवण्याचे सरकारचे प्रयत्न आता उघडकीस आले आहेत. आम्ही काल अटक केलेल्या सर्व शांततावादी निदर्शकांना त्वरित मुक्त करण्याची मागणी करतो. परेडमधील ट्रॅक्टर व इतर वाहनांचे नुकसान करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांचा देखील आम्ही निषेध करतो.
तसेच,ज्यांनी राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आम्ही मागणी करतो.
शेतकरी हे सर्वात मोठे राष्ट्रवादी आहेत आणि ते देशाच्या चांगल्या प्रतिमेचे रक्षण करणारे आहेत.
प्रजासत्ताक दिनी काही अप्रिय घटनांची नैतिक जबाबदारी घेण्याबरोबरच
संयुक्त किसान मोर्चाने 1 फेब्रुवारी रोजी होणारा संसद मार्च पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच 30 जानेवारी रोजी गांधीजींच्या शहीद दिनी शांतता आणि अहिंसा यावर जोर देण्यासाठी देशभर एक दिवस उपवास पाळला जाईल.
येत्या काही दिवसात पुढील योजना व उपक्रम जाहीर करण्यात येतील, असे संयुक्त किसान मोर्चाचे म्हणले आहे.
सिंघू बॉर्डर वर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गोळीबार, घटनेने खळबळ
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 17, 2021, 20:30 PM
WebTitle – sanyukt-kisan-morcha-said-the-government-made-the-farmer-movement-violent
Comments 1