मुंबई, 15 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असणारा सागर बर्वे याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलीय.यात अनेक बाबी उघड होत आहेत. Sagar Barve, an IT engineer who threatened Sharad Pawar सागर बर्वे याने शरद पवार यांना धमकी का दिली? याचा पोलिस तपास करत आहेत.चौकशीत सागर बर्वे ने असं म्हटलंय की,नैराश्य आलं म्हणून मी शरद पवार यांना धमकी दिली होती.सागर बर्वे हा पेशाने आयटी इंजिनीअर असल्याचे कळतंय,म्हणजे आरोपी सागर बर्वे हा सुशिक्षित आहे.

खोट्या नावाने फेसबुक पेज बनवून धमकी
राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या सागर बर्वे ची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. सागर बर्वे नं शरद पवार यांना फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून खोट्या नावाने फेसबुक पेज बनवून धमकी दिली होती.धमकी मागच्या मुळ कारणाचा पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. सागर बर्वे हा अविवाहित असून त्याचं लग्न होत नसल्याचे समोर आलंय, लग्न होत नसल्याने त्याला नैराश्य आले असल्याचे त्याने चौकशीत म्हटलंय. दरम्यान,सोशल मिडियात अलिकडे औरंगजेबच्या मुद्यावरून सामाजिक दुफळी आणि ध्रुवीकरण ठळकपणे दिसून येत आहे.यामुळे औरंगजेब च्या मुद्यावरून उदात्तीकरण अन राजकारण यामुळे सागर बर्वे म्हणे व्यथित झाला होता,आणि म्हणून त्याला नैराश्य देखील आलं अन यामुळेच त्यानं शरद पवार यांना तुमचाही दाभोळकर करू अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा सागर बर्वे याने पोलीसांच्या चौकशीत केला आहे.
कायदा सुव्यवस्था अन लोकांच्या जीविताचा प्रश्न
यात कितपत तथ्य आहे? हा पोलिसांच्या तपास-चौकशीचा भाग आहे.
मात्र सागर बर्वे सारखे लोक या पातळीवर उतरतात हे मनाला पटत नाही.
यामागे केवळ नैराश्य हे एकमेव कारण असू शकतं यावर विश्वास बसत नाही.
एखाद्याला नैराश्य आलं अन त्याला वाटलं म्हणून तो कुणालाही धमक्या देत सुटतो का? जीव घेत सुटतो का?
तसे असेल तर अशा लोकांना समाजात मोकळे सोडणे सुद्धा अत्यंत घातक ठरू शकते,
अशा लोकांना कायदा सुव्यवस्था अन लोकांच्या जीविताचा प्रश्न लक्षात घेऊन,
लोकांच्या सुरक्षेसाठी आजन्म कारावासात ठेवणे हे सर्वांच्या भल्याचे आहे.
‘नर्मदाबाई पटवर्धन’ बनून का दिली धमकी?
इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलांस वापरुन मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सागर बर्वे चा ठावठिकाणी शोधला आणि तो पुण्यातच सापडला,पुण्यातून त्याला रविवारी उचलण्यात आले.आरोपी सागर बर्वे ला बेड्या ठोकून मुंबईला आणण्यात आलं.आरोपी सागर बर्वे हा पेशाने आयटी इंजिनीअर असल्याचे कळते.फेसबुक या सोशल मिडियावर त्याने ‘नर्मदाबाई पटवर्धन’ असं बाईच्या फेक नावानं एक पेज तयार केलं होतं.या पेजवरूनच सागर बर्वे याने राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांना “तुमचा दाभोळकर करू” अशी धमकी दिली होती.
सिनेअभिनेते किरण माने यांनाही दिली होती धमकी
सागर बर्वे याने सिनेअभिनेते किरण माने यांनाही धमकी तसेच अत्यंत घाणेरड्या भाषेत ट्रोल केल्याचे कळते.sagar barve actor kiran mane facebook post हे प्रकरण एक वर्षापूर्वी घडले असल्याचे स्पष्ट झालेय,यावरून सागर बर्वे हा औरंगजेब प्रकरणातून नैराश्यात वगैरे गेल्याचं त्याने पोलिस चौकशीत खोटं सांगितलं आहे.सागर बर्वे हा सराईत ट्रोल असल्याचे कलाकार अभिनेते किरण माने यांच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.
किरण माने यांची फेसबुक पोस्ट खाली देत आहोत.
“सागर बर्वे.
मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास ! तुझं खरं नांव उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं. ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते.
गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही. तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? पण आज तू तुरूंगात गेल्यामुळं शरमेनं मान खाली घालावी लागली की नाही बिचार्यांना? आजकालच्या ‘फॅशन’नुसार काहीजण तुझ्या जातीवर जातील. पण जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत. चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव ‘सागर’ ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे.”
नथुराम गोडसे
नथुराम गोडसे ने जेव्हा गांधीजींचा खून केला होता,तेव्हा त्याला एक खूनी म्हणून ट्रीटमेंट न देता,त्याला माथेफिरू,देश रक्षक धर्म रक्षक असली लेबल्स लावून त्याचं उदात्तीकरण करण्यात येत होतं,अन आजही त्याचं उदात्तीकरण भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीपासून त्यांच्या पक्षातील अनेक नेते करत असतात,त्याला अभिवादन श्रद्धांजली वगैरे वहात शहीद म्हणण्याचा अगोचरपणा देखील केला जातो.निष्पाप लोकांचे खून करून खुन्यांचे उदात्तीकरण करण्याची ही संस्कृती ही एका विशिष्ट विचारसरणीचा भागच आहे.त्यामुळे त्यांच्यात कुणी अतिरेकी,खूनी,बलात्कारी सापडला तर तो संस्कारी असतो.त्याचं उदात्तीकरण केलं जातं,माथेफिरू अथवा मानसिक अवस्था ठिक नाही.नैराश्य आलं वगैरे म्हणत त्याने केलेल्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न सातत्याने एका विशिष्ट विचारसरणीकडून होत आला आहे.
ईको सिस्टिम
काही केसमध्ये मिडियाकडून गुन्हेगारांची नावेच जाहीर केली जात नाहीत,ती दडवली जातात,तर काही केसमध्ये गुन्ह्याचे मुळ कारण दडवून पीडित लोकांनाच गुन्हेगार ठरवून प्रकरण ट्विस्ट केले जाते.हे करण्यासाठी मिडिया अग्रभागी असते,आता त्याला सोशलमीडियाची भक्कम साथ मिळाली आहे.त्यामुळे फेसबुक व्हाटसेपवरून तशा पोस्ट व्हायरल केल्या जातात.जेणेकरून गुन्हेगाराला समाजातून तिरस्कार न मिळता सहानुभूती मिळेल,अशाप्रकारे त्यांची ईको सिस्टिम काम करत असते.बहुजन समाजाने हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

मिलिंद धुमाळे
संपादक – जागल्याभारत
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार,खामेनलोकमध्ये गोळीबारात 9 ठार
Biparjoy:’बिपरजॉय’ म्हणजे काय? वादळाना नाव कोण देतं? जाणून घ्या
जात चोरी : उपसंचालक डॉ जसवंत दहिया ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 15, JUN 2023, 12:20 PM
WebTitle – Sagar Barve, an IT engineer who threatened Sharad Pawar