Biparjoy Latest News: या आठवड्यात गुजरात, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ‘बिपरजॉय’ नावाचे तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले होते. या दरम्यान 125-135 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत Biparjoy cyclone: ‘बिपरजॉय’ वादळ मंगळवारी गुजरातला धडकलं,हवामान खात्याने गुरुवारी (15 जून) गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान लँडफॉल होण्याची शक्यता वर्तवली होती,वादळाने मात्र मंगळवारीच कूच केले आहे.
‘बिपरजॉय’ हे नाव कोणी ठेवले?
‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाला बांगलादेशने नाव दिले आहे. हे बंगाली नाव असून त्याचा अर्थ ‘आपत्ती’ असा आहे.
जगातील सर्व देशांना वादळाला नाव देण्याची संधी मिळत असते. अर्थात यासाठी काही नियमही आहेत.
वादळाला कोण नाव देतं?
जगभरात 6 प्रादेशिक विशेष हवामान केंद्रे (Regional specialized meteorological centers (RSMC) आहेत.
तर 5 प्रादेशिक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ इशारा केंद्रे (Regional Tropical Cyclone Warning Centres) आहेत.
या प्रादेशिक केंद्रांना वादळ सूचना जारी करण्याचे आणि वादळांची नावे देण्याचा अधिकार आहे.
भारताची भूमिका काय आहे?
भारतीय हवामान विभाग (IMD) हे जगातील 6 रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स (RSMC) पैकी एक आहे,
जे 13 देशांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आणि वादळाच्या वाढीच्या सूचना जारी करते.
भारताव्यतिरिक्त या देशांमध्ये बांगलादेश, इराण, मालदीव, म्यानमार ओमान, पाकिस्तान,
कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, यूएई आणि येमेन या देशांचा समावेश आहे.
भारताला नाव कधी देता येईल?
बंगालच्या उपसागरात (BOB), अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नाव देण्याचा अधिकार
नवी दिल्ली येथील प्रादेशिक विशेषीकृत हवामान केंद्रांना (RSMC) आहे.
एकूणच, विविध महासागरांमध्ये तयार झालेल्या चक्रीवादळांना तेथील प्रादेशिक RSMCs द्वारे नावे दिली जाऊ शकतात.
चक्रीवादळांना नाव देण्याचे नियम काय आहेत?
जो देश चक्रीवादळ आणि उष्णकटिबंधीय वादळाला नाव देतो त्याला अनेक नियम पाळावे लागतात. उदाहरणार्थ, वादळाचे नाव पूर्णपणे तटस्थ असावे. त्याचा कोणत्याही प्रकारच्या राजकारणाशी आणि राजकीय विचारसरणीशी, धार्मिक श्रद्धा, संस्कृती, लिंगाशी संबंध नसावा. वादळाचे नाव असे असावे की ते जगातील कोणत्याही लोकसंख्येला किंवा देशाला कोणत्याही प्रकारे दुखावणार नाही. थोडक्यात भावना दुखावणारे नसावे,वादळाचे नाव अपमानास्पद नसावे. ते सहज वाचता किंवा बोलता येईल असे असावे.
पुढील चक्रीवादळाला भारताने काय नाव दिले आहे?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वादळाचं नाव जास्तीत जास्त 8 अक्षरच ठेवता येतंय.आता पुढच्या वादळाला नाव देण्याची संधी भारताची आहे. भारताने ‘तेज’ नाव सुचवले आहे.
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 13, JUN 2023, 22:30 PM
WebTitle – What is ‘Biparjoy’? Who names storms? find out