सोनीपत : एकीकडे आरक्षणाच्या नावाने बोटं मोडायची दुसरीकडे जात चोरून आरक्षणाचे फायदे उपटायचे असे दुहेरी चरित्र देशातील जातीयवादी समाजाचे आहे.हरियाणाच्या सोनीपत पोलिसांनी पशुसंवर्धन विभागात उपसंचालक म्हणून तैनात असलेल्या डॉ.जसवंत दहिया याला अटक केली आहे.दहिया याच्यावर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप याप्रकरणी महिला डॉक्टर रितू यांनी सीएम फ्लाइंगमध्ये याबाबत तक्रार केली असता, चौकशी केल्यानंतर जसवंत दहिया दोषी आढळून आला.दहियाने 1986 मध्ये कृषी विद्यापीठ, हिसार येथून बनावट जात प्रमाणपत्र चिकटवून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धनाची पदवी मिळवली. या पदवीच्या जोरावर त्याला सरकारी नोकरीही मिळाली. आणि एवढी वर्षे तो नोकरीत पगार भत्ते मिळवून ऐष करत होता.

बनावट अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र प्रकरण
1986 मध्ये, सोनीपतचा रहिवासी असलेले डॉ.जसवंत सिंग दहिया याने फसवणूक करून प्रथम अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि नंतर हिसार कृषी विद्यापीठातून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयात बॅचलर पदवी मिळवली. याप्रकरणी महिला डॉक्टर रितू यांनी सीएम फ्लाइंगमध्ये याबाबत तक्रार केली असता. सीएम फ्लाइंगच्या तपासात दहिया दोषी आढळल्याने आता सोनीपत पोलिसांनी सीएम फ्लाइंगच्या तक्रारीवरून कारवाई करत नोकरीवरून निलंबित करून डॉ.जसवंत दहिया याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
डॉ.दहिया यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश घेतला होता
या संपूर्ण प्रकरणामध्ये उपनिरीक्षक विजेंदर सिंह यांनी सांगितले की, आम्ही चंदीगड येथील पशुसंवर्धन विभागात उपसंचालक म्हणून तैनात असलेल्या डॉ.दहिया यांना बनावट जात प्रमाणपत्र दाखवून पदवी मिळवल्याप्रकरणी अटक केली आहे. डॉ.दहिया यांनी 1986 मध्ये बनावट प्रमाणपत्राच्या आधारे कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला होता.1996 मध्ये त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यावर उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून त्यांना वाचवले होते.
एखाद्याची जात चोरून त्याची संधी हिरावून घेणे हाही एक प्रकारचा जातीयवादच आहे. तुम्हाला काय वाटतं?
कमेंट करून कळवा
जात उघड करायची नसेल तर आडनाव बदलू शकता – कोर्ट
हॉटेल मध्ये जेवायला गेलेल्या दलित रिक्षा चालकाची हत्या
क्रिकेट बॉल ला स्पर्श केला म्हणून दलित व्यक्तीचा अंगठा कापला, दोघांना अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 13, JUN 2023, 16:15 PM
WebTitle – fake Caste certificates: Deputy Director Dr. Jaswant Dahiya arrested