मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली असून, हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार असून एकूण ३४ कुटुंबीयांसाठीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाना १० लाख रूपये देण्याची घोषणा मागच्या सरकारच्या काळात करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ प्रत्येकी ५ लाख रूपये एकूण १५ कुटुंबीयांना देण्यात आले होते. मागील सरकारने दिलेले आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल तसेच संबंधित कुटुंबीयांना राज्यशासनाकडून प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिले होते.
या आश्वासनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
आजवर शासनाची मदत न मिळालेल्या १९ वारसांना प्रत्येकी १० लाख
तर यापूर्वी अगोदरच ज्याना ५ लाख रूपये मिळाले आहेत
अशा १५ कुटुंबांच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाख रूपये या निधीतून दिले जाणार आहेत.
शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबीयांमध्ये बीड जिल्ह्यातील ११,औरंगाबाद जिल्ह्यातील ६,पुणे ३,जालना ३,नांदेड २,उस्मानाबाद २ तसेच सोलापूर परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक अशी एकूण संख्या आहे.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बुडवली;शाळेला दीड लाखांची नोटीस !
माणसाचा नेक-विवेक जागवणारा चित्रपट : ‘जयंती’
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 30, 2021 21:15 PM
WebTitle – Rs 10 lakh each to the heirs of those killed in Maratha agitation