मुंबई दि.02 – महाराष्ट्र राज्याच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकसत्ता’ने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ दूर-संवादमाला आयोजित केली आहे.महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात राज्यातील प्रमुख पक्षांचे येत्या दहा वर्षांतील राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध राजकीय व्यक्तींशी संवाद साधण्यात येत आहे.आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचा (क्लू) बोलताना भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाचा (क्लू) भूमिका मांडतानाच प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीलाच देशातील कोरोनाच्या संकट आणि उपाय योजनांवर भाष्य करून संवेदनशील सामाजिक आणि राजकीय नेत्याकडे असणारे विशेष दूरदृष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा प्रत्यय दाखवून दिला.कोकणाच्या विकासापासून विदर्भाच्या विकास आणि प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले.
महाराष्ट्रात अशा पद्धतीचा दृष्टिकोन असणारे फार कमी नेते असतील. आज सत्तेत असणाऱ्या नेत्यांना हा दृष्टिकोन असता तर आज एड. प्रकाश आंबेडकरांना हे मुद्दे मांडण्याची संधी मिळाली नसती.परंतु महाराष्ट्रातील नेत्यांची राजकारणात हयात गेली तरी महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्न सोडवता आलेले नाहीत.हे वास्तव इथं स्वीकारण्यावाचून पर्याय उरत नाही.
धर्म आणि जात याने देशाला ओव्हरटेक केलं आहे
2014 नंतर देशातील राजकारण झपाट्याने धर्म आणि जात या दोन गोष्टींभोवती जाणीवपूर्वक ठेवले गेले.त्याचा परिणाम देशातील प्रत्येक जातींचं एक अस्मितावादी राजकारण उभं राहिलं.प्रकाश आंबेडकरांनी याच मुद्याकडे लक्ष वेधत देशाला या दोन मुद्यांनी ओव्हरटेक केल्याचे मत मांडले आहे.आणि हे आज आपण अनुभवत आहोत.आज लोकांना ऑक्सिजन बेड लसी आणि आपल्या जीवाची पर्वा उरली नसून धर्माच्या नावाखाली निर्माण केलेले प्रश्न महत्वाचे वाटू लागले आहेत.जातींचे मुद्दे महत्वाचे वाटू लागले आहेत,हे जातींचे मुद्दे न्यायाच्या बाजूने नसून दुसऱ्या जातीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने जास्त उपद्रवी ठरले आहेत असे दिसते.या संदर्भात आताची ताजी दोन उदाहरणे पाहता येतील.एक महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा यास मराठा क्रांती मोर्चा ने केलेला विरोध आणि दुसरं ट्विटरवर चालेलं वॅक्सिन जिहाद हॅशटॅग ट्रेंड किंवा असेच अनेक ट्रेंड ज्यात हिंदू खतरे में है म्हणत मुस्लिम समाजाचे दानवीकरण केले जाते.
आपली परिस्थिती बांगलादेशपेक्षाही वाईट
जगभरातील करोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात माहिती देणाऱ्या वल्डोमीटरचा हवाला देत प्रकाश आंबेडकर यांनी देशामध्ये २९ मे २०२१ पर्यंत २ कोटी ७७ लाख रुग्ण असल्याचं सांगितलं. यापैकी २ कोटी ५१ लाख रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. सर्व आकडेमोड करुन पाहिल्यास आवश्यक इतके बेड्स पुरवण्यात राज्य सरकारांना अपयश आल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या लाटेत दिवसाला ६० हजार रुग्ण सापडले. याची सरासरी पाहिली तर ३६ जिल्ह्यांमध्ये दिवसाला १६०० बेडची आवश्यकता होती. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात २३ हजार बेड्सची गरज असताना ही सेवा राज्य सरकारला देता आली नाही, असं आंबेडकर यांनी आकडेवारीसहीत सांगितलं.
मराठा आरक्षणाचा क्लू
या मुलाखातीत प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण संदर्भात अतिशय महत्वाचा क्लू दिलेला आहे.तो जर अंमलात आणला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सहजी सुटणार आहे.केंद्र सरकारने केलेली 102 वि घटना दुरुस्ती ही टिकणारी नाही परंतु न्यायालय या संदर्भात सुनावणी घेत नाही.माझा जो घटनेचा आणि त्या संदर्भातील जो अभ्यास आहे त्यानुसार हे टिकणार नाही,सर्वोच्च न्यायालयाने याबाबत ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे.
भाजपची बी टीम असल्याचा मुद्दा निकालात
“राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि डावे यांच्यासाठी मी अस्पृश्य झालोय आणि त्यामुळेच ते मला भाजपाकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. मला जर भाजपाकडे जायचंच असेल, तर कोण रोखणार आहे?
मी स्वतःचा मालक आहे. भाजपासोबत जायचं की नाही हा माझ्या पक्षाचा निर्णय आहे. मी भाजपासोबत गेलो, तर काँग्रेस काय करणार आहे?,” असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर निशाणा साधला.
हा मुद्दा आणखी स्पष्ट करताना ते म्हणाले की त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी एकमेव व्यक्ती होतो,
जो मोदींच्या हाताला लागलेलो नव्हतो. त्यामुळे मोदींच्या खुनाच्या कटाच्या निमित्ताने तरी हाताला लागतो का, हे त्यांनी बघितलं.
(म्हणजे जे लोक खुनाच्या कटात अडकवू पाहतात पुन्हा त्यांना समर्थन कुणी कशाला देईल?) मुद्दा असा आहे की,
मोदी हे २०१४ नंतरचे आहेत. भाजपा २०१४ नंतरची. त्याआधी तर मी काँग्रेससोबत होतो.
२०१४ च्या निवडणुकीत सलग चार वेळा पराभूत झालेल्या जागा आम्हाला द्या, असं आम्ही काँग्रेसला म्हणालो होतो.
काँग्रेसने का नाही दिल्या. काँग्रेसला हा प्रश्न का विचारला जात नाही,” असं आंबेडकर म्हणाले.
तिसऱ्या लाटेमध्ये पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता
हॉस्टेल, वेगवेगळ्या संस्था, रिकामे फ्लॅट्स अनेक ठिकाणी करोनासंदर्भातील सुविधा पुरवण्यासाठी
घेता आले असते पण ते घेतले नाहीत, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तिसऱ्या लाटेसंदर्भातील आकडेवारीच्या आधारे अंदाज व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी,
“तिसऱ्या लाटेत प्रत्येक जिल्ह्याला ५० हजार बेड्स लागतील. लहान मुलांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जातं.
लहान मुलांबरोबर आई वडिलांना ठेवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्यात?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सध्या करोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झालाय. मात्र औषध मिळालं असतं तर तीन ते चार वर्षे जगले असते,
असं सांगत राग व्यक्त केला जातोय मात्र त्याची दाहकता अधिक नाहीय.
पण तिसऱ्या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास जनतेच्या संतापाची दाहकता अधिक असेल.
तिसऱ्या लाटेमध्ये पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
भाडेकरूंसाठी मोठी बातमी! केंद्राने आणला नवा कायदा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on JUN 02, 2021 22: 54 PM
WebTitle – Religion and caste have overtaken the country – Adv. Balasaheb Ambedkar 2021-05-02