लखनऊ: शनिवारी रात्री लखनऊमधील झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाने जेवण घेण्यास नकार दिला. कारण एवढच की डिलिव्हरी बॉय दलित आहे.डिलिव्हरी बॉय दलित असल्याची माहिती ग्राहकांना समजताच जातग्रस्त मनुवादी ग्राहकाने ऑर्डर केलेले जेवण घेण्यास नकार दिला, असा आरोप केला जात आहे.
एवढेच नाही तर घरातील सदस्यांसोबत मिळून त्याला मारहाण देखील केली गेली.यावर समाधान झाले नाही म्हणून त्याच्या तोंडावर थुंकले गेले. ही संपूर्ण घटना आशियाना भागातील आहे. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 मुख्य आरोपी सहित इतर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण केवळ मारहाणीचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नाव समजताच भडकला जातग्रस्त विकृत
आशियाना येथे राहणारा विनीत रावत झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय चं काम करत आहे.
शनिवारी रात्री अजय सिंग नावाच्या ग्राहकाला डिलिव्हरी देण्यासाठी त्याला पाठवले होते.तो डिलिव्हरी घेऊन आला.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विनीतने आरोप केला आहे की, त्याने अजय सिंहला त्याचे नाव विनीत रावत असल्याचे सांगताच.तो चिडला.
नाव कळताच त्यांनी जेवणाचे पाकीट फेकून दिले. दलितांनी आणलेल्या जेवणाला हात लावला जाणार नाही, असे म्हणत त्याच्या तोंडावर थुंकले. विनीतने विरोध केला असता अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून त्याला मारहाण केली. यानंतर विनीतने पोलिसांना 112 नंबर डायल करून माहिती दिली. डायल-112 टीम घटनास्थळी दाखल झाली.
आशियानाचे स्थानिक इन्स्पेक्टर दीपक पांडे सांगतात की, अजय सिंह च्या सांगण्यानुसार,
शनिवारी रात्री जेव्हा विपिन ऑर्डर घेऊन आला तेव्हा अजय मित्राला सोडण्यास जात होता,
विनीतने त्यालाच त्याच्या घराचा पत्ता विचारला. अजयने पान मसाला खाल्ला होता.
विनीतला पत्ता सांगण्यासाठी त्याने मसाला थुंकला.
त्याचे शिंतोडे विनीतच्या अंगावर उडाले यावर विनीतने शिवीगाळ करत वाद घातला.
यावरून अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी विनीतला मारहाण केली.
वकिलासह पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर एफआयआर दाखल झाला
पोलिसांनी सांगितले की, विनीतच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पक्षांना शांत केले.
पोलीस विनीतला पोलीस ठाण्यात घेऊन येत होते. मात्र त्यांनी त्यावेळी नकार दिला.
दुसऱ्या दिवशी रविवारी विनीत वकिलासोबत आले आणि त्यांनी एफआयआर दाखल केला.
सध्या तक्रारीची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांची कसून चौकशी केली जाईल.
जवळपास बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचीही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
400 हून अधिक सीए चिनी कंपन्यांना मदत करत होते,कारवाई ची तयारी
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 20, 2022, 13:30 PM
WebTitle – Refuse to take food from Zomato delivery boy being dalit, fir lodge