मुंबई, दि. 14 : राज्यातील थांबलेली भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत असून सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना आगामी पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे.तसेच गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदांच्या भरती साठीची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेल्या बैठकीत एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजार 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट क ची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पदभरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.अशी माहिती श्री.भरणे यांनी दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. गट 'अ' ते गट 'क' पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे- सामान्य प्रशासन राज्यमंत्री @bharanemamaNCP यांची माहिती pic.twitter.com/PaajLGU03p
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 14, 2021
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ४रिक्त पदे ३१जुलैपर्यंत तातडीने भरण्याचे निर्देश दिले. @CMOMaharashtra pic.twitter.com/B4UfEyEbXd
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) July 13, 2021
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते.
त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती देखील श्री. भरणे यांनी यावेळी दिली.
प्राध्यापक भरती साठी पुणे आणि नागपूर येथे १९ जुलै पासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 14, 2021, 17: 21 PM
WebTitle – recruit for 15,000 posts in various positions in the state 2021-07-14