वाचकांच्या माहितीसाठी – सदर हिटलर वरील पोस्ट फेसबुकने रिमूव्ह केली होती,
ती आम्ही प्रकाशित करत आहोत.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही कायम पुरस्कार केला आहे.करत राहू.
हिटलर हा पहिल्या महायुद्धात जखमी झालेला अल्पशिक्षित, अल्पबुद्धी असा शिपाई होता.
भावनिक होऊन बोलणे आणि पुन्हा पुन्हा तेचतेच बोलणे हे त्याचे वैशिष्ट्य!
याने तत्कालीन जर्मन वर्कर पार्टी मधे प्रवेश केला त्यानंतर हा चक्क हॉटेल, चौक इत्यादी ठिकाणी काहीही प्रयोजन नसताना व्याख्याने देत सुटायचा. मग त्याने “राष्ट्रीय” जर्मन वर्कर पार्टी असा पक्षांतर्गत स्वत:चा एक गट तयार केला. मग आता जर्मन वंश, त्यांची उच्च संस्कृती, त्याच्यावर इतर राष्ट्रांनी केलेले घनघोर अन्याय,यावर भाषणे, बेसुमार गर्दी,आता भाषणासाठी वाढलेली डिमांड..
त्याच्या जर्मन वंशश्रेष्ठ, आजपर्यंत राज्यकर्त्यानी केलेल्या चुका यांची अत्यंत मूर्खपणाची जंत्री असणाऱ्या “माइन काम्फ”
या तर्कशून्य पुस्तकाची तडाखेबांद विक्री आणि वितरण सुरू झाले.
“जर्मन” वंशाच्या आणि राष्ट्राच्या आजच्या अवस्थेस जबाबदार कोण?
नंतर जर्मन साम्राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी २५ कलमी कार्यक्रम वगैरे (ही कलमे अतिशय भंपक आणि अव्यवहारी होती हा भाग सोडा)तर याच्या बोलण्याचे मुद्दे अतिशय ठराविक (अपमान, सूड, जर्मन वंशाची उच्च परंपरा, आत्मनिर्भर जर्मनी, मेक जर्मनी ग्रेट अगेन) असत.आणि भाषा अतिरंजित! देहबोली भयानक.वाट्टेल तसे हातवारे,चिरका आवाज, संपूर्ण साडेपाच फुटी देहाला फेफरे, तोंडातून लाळ गळणे.अधून मधून रडारड.इतके इमोशनल अत्याचार!
नेमके त्याचवेळी जर्मनीत युद्धानंतर प्रचंड अपमानाची भावना, तहाच्या अटी व आर्थिक मंदी मुळे लोकांचा सरकारवर राग होता.. एकामागून एक सरकारे बदलत होती.हिटलर भाषणे ठोकत होता.याने आधी पक्षातील धुरीण बाजूला केले.मग याचा गट पक्षाचा सर्वेसर्वा झाला.तरी पण याला अजून हुकूमाचा एक्का सापडत नव्हता.आणि मग त्याने सुरु केले “जर्मन” वंशाच्या आणि राष्ट्राच्या आजच्या अवस्थेस जबाबदार कोण?
तर “ज्यू” धर्मीय आणि त्यांचा वंश!
आता जर्मन समाजास रोज आपल्या दुरवस्थेसाठी “कारण” मिळाले,कृत्रिम “शत्रू” सापडला,वातावरण बदलले,
मग निवडणुका, त्यात बहुमत नसतानाही केवळ दबावामुळे याला “चॅन्सलर” म्हणून बोलावले.
इतर पक्ष व त्यातील लोक “राष्ट्रद्रोही” ठरले
१. ज्यू मुलाना शाळेत प्रवेश नाही,
२.ज्यू लोकाना नोकऱ्या नाहीत,
३.ज्यू लोकानी वेगळ्या वसाहतीत रहायचे,
४. ज्यू लोकांनी लगेच ओळखू यावेत म्हणून कपड्यावर पिवळा स्टार लावायचा,ते
ते … “ज्यू” लोकानी “जगायचे” नाही हा प्रकार चालू झाला व छळछावण्या उघडल्या गेल्या…
लोकशाहीवादी, साम्यवादी वा इतर सर्व पक्षांवर बंदी घालण्यात आली. मग इतर पक्ष व त्यातील लोक “राष्ट्रद्रोही” ठरले.
आईन स्टाईन सारखे विद्वान देश सोडून परागंदा झाले. ज्याना जमले नाही ते लाचार झाले किंवा मेले.
यांची एक SS म्हणून संघटना होती. नागरिकांची फौज,रोज विनाकारण संचलने बौध्दिके, खोट्या आक्रमक गोष्टीचा प्रचार,
आणि महत्वाचे काम म्हणजे,जर्मन आणि ज्यू यांचे एकमकांशी दोस्ती, प्रेम,लग्न होत नाही याची काळजी घेणे.
हा मूर्ख माणूस आणि त्याची टोळी त्याला फ्युरर (लाडका महान नेता) म्हणू लागली,जे फ्युरर च्या विरुद्ध बोलतील ते डायरेक्ट “राष्ट्रद्रोही” ठरले.
याच्या गोबेल्ससारख्या चमचांनी प्रौपोगंडातंत्र विकसित केले.
याच्या नावाने छापून आलेली आणि याने बोललेली प्रत्येक गोष्ट म्हणजे ब्रह्मवाक्य झाले.
केवळ जर्मनीत नाही तर संपूर्ण जगालाच याच्याशिवाय पर्याय नाही असे जर्मन जनतेला वाटू लागले.
पुढे काय झाले की जर्मनी ने युद्ध लादले.मग जर्मनी बेचिराख झाला,त्याचे दोन तुकडे झाले,घराघरातील तरुण मेला.
आणि 30 एप्रिल 1945 रोजी रोजी हिटलर आत्महत्या करून कुत्र्याच्या मौतीने मेला!
सदर माहिती ही फक्त जर्मनी आणि हिटलर याविषयी आहे..!
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on APR 30, 2022 15:40 PM
WebTitle – Read and think about the post on Hitler which is deleted by Facebook