सोशल मिडियात बायकॉट पतंजली #BoycottPatanjali हा ट्रेंड टॉप ट्रेंड करत आहे.(social media trends Boycott Patanjali) हरियाणातील कर्नाल येथे एका खाजगी कार्यक्रमात बाबा रामदेव (Baba Ramdev) सहभागी झाले होते.पेट्रोल च्या वाढत्या किंमती आणि महागाई च्या प्रश्नावर पत्रकाराने प्रश्न विचारल्याने रामदेव बाबा भडकले.रामदेव बाबा यांनी थेट पत्रकाराला धमकी दिली.त्यामुळे लोक चिडले असून आता रामदेव बाबा लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. लोक त्यांच्या पतंजली कंपनीवर नाराजी दर्शवत आहेत. पतंजलीवर बहिष्कार टाकण्याबाबत बोलत आहेत.
सोशल मिडियात लोक करत आहेत ट्रोल पतंजलीवर बहिष्कार
#BoycottPatanjali सोशल मिडीयावर ट्रेंड करत आहे.
बाबा रामदेव यांना ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले –
ढोंगी सलवारी बाबाचा खरा चेहरा लोकांसमोर येत आहे. काही कमेंट बघा..
tribal army या अकाऊंटवरून म्हटलं गेलंय की “पतंजली उत्पादने मानवी वापरासाठी हानिकारक आहेत.तरीही आयुर्वेदाच्या नावाखाली विष विकणारा फसवणूक करणारा बाबा. #पतंजलीवर बहिष्कार टाका”
पेट्रोल,महागाई च्या प्रश्नावर का भडकले रामदेव बाबा?
एका कार्यक्रमात पत्रकाराने रामदेव बाबा ला प्रश्न विचारला होता की, “काँग्रेसच्या काळात तुम्ही टीव्ही चॅनल्सवर हे म्हणाला होतात की (जनतेला) तुम्हाला 40 रुपये लिटर तेल देणारे सरकार हवे की 300 रुपये भावाने तेल देणारे सरकार हवे आहे? आता भाजपचे सरकार आले आहे आणि तेलाचे भाव 100 रुपयांवर गेले आहेत, यावर तुमचे काय म्हणणे आहे? “
या प्रश्नावर रामदेव बाबा भडकले,हा अडचणीचा प्रश्न विचारल्याने रामदेव बाबा संतापून म्हणाले, “तू खूप प्रश्न विचारले आहेस.जरा काहीतरी चांगलं काम सुद्धा करत जा”
यावर पत्रकार त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारतो की , “तुम्ही म्हणाला होतात ना असे सरकार बनवा? म्हणाला होता की नाही?”
या प्रश्नावर रामदेव बाबा चिडून म्हणाले, “हा, म्हणालो होतो मग काय? आता शेपूट धरून बसणार का माझी?”
पत्रकार पुन्हा रामदेव बाबा ला प्रश्न विचारतो, “तुम्हीच म्हणाला होता ना?”
या प्रश्नावर रामदेव बाबा चिडून म्हणतात,” मी तुझ्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा ठेका घेतला आहे का?”
या उत्तरावर पत्रकार विचारतो,” तुम्ही टीव्हीवर हे म्हणाला होता की नाही?” सगळीकडे ते सतत दाखवलं जात होतं.”
यावर रामदेव बाबा आणखी संतापले आणि म्हणाले, हो बोललो होतो, मग काय करणार तू?”
“आता गप्प बस,पुन्हा विचारलंस तर ठीक नाही होणार,”
अब चुप हो जा, नहीं हो ठीक नहीं होगा। कै करेगा, चुप हो जा, आगे पूछेगा तो ठीक नहीं होगा।

सामाजिक कार्यकर्ते हंसराज मीना यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला रामदेव बाबा महागाईवर बोलताना दिसतात.ते म्हणतात की महागाई वाढली आहे.हे खरं आहे.
पण दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत.सरकार म्हणत आहे की तेलाचे भाव कमी झाले तर टॅक्स मिळणार नाही.देश कसा चालवणार?
सैन्याला पगार कुठून देणार? रस्ते कसे बनवणार? एअरपोर्ट कसे बनवणार ? पुढे रामदेव बाबा म्हणाले महागाई कमी झाली पाहिजे? तर मेहनत जास्त करा.मी संन्यासी असूनही सकाळी ४ वाजेपासून १० वाजेपर्यंत काम करतो.माझी काय मुलं उपाशी मरत आहेत?
या वाक्यावर रामदेव बाबाच्या अवतीभवती बसलेले लोक आनंदाने टाळ्या वाजवून दाद देतात,एका छद्मी राष्ट्रवादाला आपण कसे बळी पडलो आहोत याचं त्यांना भान नाही.दुर्दैव हे की यात स्त्रियांचे प्रमाण दिसते.आणि रामदेव बाबाला प्रश्न विचारू नये म्हणून मागे बसलेली एक मुलगी पत्रकाराला टोकताना दिसत आहे.
एकूणच महागाईत होरपळणाऱ्या गरीब सामान्य जनता अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडून छद्मी देशभक्त लोकांच्या तावडीत सापडून जगण्याचा संघर्ष करत आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 31, 2022 11:00 AM
WebTitle – Ramdev Baba Threatens Journalist Who Asked About petrol, inflation