गुजरात,दि. 24: काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरात मधील सूरत येथील दंडाधिकारी कोर्टात हजर झाले आहेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदाराने हा खटला दाखल केला असून याचप्रकरणी राहुल गांधी जबाब नोंदण्यासाठी कोर्टात हजर झाले आहेत.
सूरतचे भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत एप्रिल २०१९ मध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात एका आठवड्यापूर्वी गुजरात सूरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी ए एन दवे यांनी राहुल गांधी यांना २४ जून रोजी अंतिम जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान कोर्टात हजर होण्याच्या काही तास आधी राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की “अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य कोणतीही भीती न बाळगणे आहे”
एका कार्यक्रमात “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्यासारखं सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं काय?,”
असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.
कोर्टाने त्यांना त्यांच्या 2019 च्या भाषणाबद्दल विचारले असता ते म्हणाले की “व्यक्तिशः मला त्याबद्दल माहिती नाही.”आम्ही कोर्टाला सरकारी नोकरदार असलेल्या दोन साक्षीदारांना सादर करण्याची आमची विनंती केली होती.कोर्टाने ती फेटाळून लावली. म्हणून आम्ही हायकोर्टाकडे गेलो. जर आमची विनंती मान्य केली गेली तर, त्याना कोर्टात परत यावे लागेल. 12 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. असं तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितलं.
प्रशांत किशोर कॉँग्रेस मध्ये सामील होणार?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 24 , 2021 13 : 35 PM
WebTitle – Rahul Gandhi in Gujarat court; The case is related to Modi 2021-06-24