Rahul Bajaj News: देशातील यशस्वी उद्योगपतींपैकी एक असलेले राहुल बजाज यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.राहुल बजाज दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. चेतक स्कूटर बनवणाऱ्या बजाज ग्रुपचे ते चेअरमन देखील होते, जी एकेकाळी भारतातील अनेकांसाठी दिल कि धडकन होती.
उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी राहुल बजाज यांना 2001 मध्ये भारत सरकारने उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी बंगाल येथील प्रेसिडेन्सी मध्ये झाला होता.1938 मध्ये जन्मलेले राहुल राज्यसभेचे सदस्य आणि देशातील आघाडीच्या दुचाकी कंपनी बजाज ऑटोचे अध्यक्ष आहेत. राहुल बजाज यांना ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानही प्रदान करण्यात आला आहे.
राहुल बजाज यांनी 1960 च्या दशकात बजाज समूहाचे नेतृत्व स्वीकारले आणि 2005 मध्ये बजाज समूहाचे अध्यक्षपद सोडले होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा राजीव बजाज यांनी ही जबाबदारी स्वीकारली. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिक उंचीवर नेण्यात राहुल यांचा मोठा वाटा होता.
स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी स्वातंत्र्यपूर्व पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात झाला. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांचे नातू आहेत. सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात बीए मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यानंतर त्यांनी तिथल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री पूर्ण केली.
जवाहरलाल नेहरूंनी ठेवलं नाव
राहुल बजाज यांच्या वडिलांचे नाव कमलनयन बजाज (Kamalnayan Bajaj) आणि आईचे नाव सावित्री बजाज (Savitri Bajaj) होते. महात्मा गांधी राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj) यांना त्यांचा पाचवा मुलगा मानत. जमनालाज बजाज हे भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचेही चांगले मित्र होते. कमलनयन बजाज आणि भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.
‘बेस्ट स्टोरीज ऑफ इंडियन बिझनेस वर्ल्ड’ (मंजुल पब्लिशिंग) या पुस्तकानुसार कमलनयन बजाज यांच्या पहिल्या मुलासाठी ‘राहुल’ हे नाव खुद्द जवाहरलाल नेहरूंनी निवडले होते. याचा राग त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांना होता. वास्तविक, आपल्या मुलाचे नाव राहुल ठेवण्याची इंदिराजींची इच्छा होती. नंतर इंदिराजींच्या नातवाचे नाव राहुल गांधी ठेवण्यात आले. विशेष म्हणजे राहुल बजाजने आपल्या पहिल्या मुलाचे नाव राजीव (राजीव बजाज) ठेवले आहे.
राहुल बजाज यांचा आरक्षणाला विरोध होता
बजाज ऑटो लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असताना राहुल बजाज यांनी आणि टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष रतन एन टाटा यांनी 2006 साली हैद्राबाद येथे एका कार्यक्रमात उच्च शिक्षण संस्थांमध्ये, विशेषतः विनाअनुदानित संस्थांमधील आरक्षणाला विरोध केला होता. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 2006 च्या ग्रॅज्युएशन क्लासमध्ये भाग घेतल्यानंतर हैदराबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “आम्ही संधी निर्माण करणारा देश निर्माण केला पाहिजे, ना की आरक्षण.” मात्र पुढे ते म्हणाले की “आपल्या देशात लोकशाही आहे आणि आम्ही असहमत असलो तरी सरकारच्या निर्णयाला आम्ही बाजूला ठेवू शकत नाही.मात्र, वक्तव्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निदर्शने झाली.आंदोलने झाली त्याचे नेतृत्व ओबीसींनी केले होते.यानंतर राहुल बजाज यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.
हमारा बजाज ची रोचक कथा
बजाज ऑटोच्या स्थापनेपासूनच्या यशाची कहाणीही रोचक आहे. बजाज ऑटो 29 नोव्हेंबर 1945 मध्ये अस्तित्वात आली. पूर्वी ही कंपनी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन होती.जमनालाल बजाज हे त्यांच्या काळातील प्रस्थापित उद्योगपती होते. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी भाग घेतला. त्यांनी व्यवसाय करण्यासाठी ‘बच्छराज अँड कंपनी’ ची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुले कमलनयन आणि रामकृष्ण बजाज यांनी ‘बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ची स्थापना केली.सुरुवातीला बच्छराज ट्रेडिंग कंपनीद्वारे परदेशातून काही स्पेअर पार्ट आयात करून दुचाकी आणि तीनचाकी वाहने बाजारात आणली जात होती.1959,साली कंपनीला दुचाकी निर्मिती करण्याचे लायसन्स मिळालं.आणि पहिली व्हेस्पा स्कूटर (Vespa Brand) बनवण्यात आली.असं म्हटले जातं की, पहिली बजाज व्हेस्पा स्कूटर गुडगावमधील गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती.1960 मध्ये कंपनी पब्लिक लिमिटेड म्हणून लिस्टेड झाली.
व्हेस्पा ची प्रेरणा असणारं बजाज चेतक ब्रँड
व्हेस्पा स्कूटरच्या प्रेरणेतून बजाज कंपनीने पुढे बजाज चेतक ची 1972 मध्ये निर्मिती केली. आणि अस्तित्वात आला “हमारा बजाज” ब्रँड ज्याने अनेक दशके भारतीय दुचाकी वाहन बाजारात अधिराज्य गाजवलं.असं म्हणतात कि बजाज चेतक ची बुकिंग करूनही दहा दहा वर्षे स्कुटरची डिलिव्हरी मिळत नसे.एवढी वेटिंग बजाज चेतक साठी करावी लागत असे.त्यावेळी देशभरात बजाज चेतक चे केवळ 600 डीलर होते.या काळात बजाज ऑटोचा बाजारातील हिस्सा जवळपास 60 टक्के होता.
भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या या स्कुटरची ही तांत्रिक दोषाची बाजू अशी की
अनेकदा स्कुटर वाकडी करून,एका बाजूला झुकवून मगच स्टार्ट करावी लागत असे.
अर्थात हा एक दोष सोडला तरी तिची लोकप्रियता मात्र कधीही कमी झाली नाही.
यामागे आणखी एक तंत्र होतं जाहिरातीचं “हमारा बजाज” हे ब्रॅण्डिंग कंपनीसाठी गेम चेंजर ठरलं.
“बुलंद भारत की बुलंद तसवीर, हमारा बजाज” ची जाहिरात अनेकांच्यासाठी देशप्रेमापेक्षा कमी नव्हती.
1986 मध्ये चेतकच्या विक्रीचा आकडा 8 लाखांवर पोहोचला होता. जो एक विक्रम होता.
बजाजसाठी 90 चे दशक हा सुवर्णकाळ होता या काळात कंपनीने दर महिन्याला तब्ब्ल एक लाख स्कूटर विकण्याचा विक्रम केला होता.
दोन वेगळ्या पिढ्यांचे साक्षीदार
1991 मध्ये भारतात उदारीकरणाला सुरुवात झाली.आधुनिक डिझाइन/तंत्रज्ञानाचा उदय झाला,
विशेषतः काही जपानी मोटरसायकलमध्ये नव्या तंत्रांचा वापर करत दुचाकी बाजारात आणल्या गेल्या.
दुसरीकडे पेट्रोलच्या किमतीत झालेली वाढ आणि ग्रामीण भागात मोटारसायकलींचा वाढता स्वीकार
यामुळेही बाइकची मागणी वाढली होती.हे लक्षात घेऊन बजाज ऑटोचे व्यावसायिक धोरण बदलले,
ज्याने त्यांच्या पहिल्या स्वतंत्रपणे विकसित मोटरसायकल, पल्सरला जन्म दिला.
ही मोटारसायकल जपानी कंपनी कावासाकीसोबतच्या भागीदारीतून आधीच लॉन्च करण्यात आली होती,जी आजपर्यंत सुरू आहे.
बजाज चेतक नंतर बजाजची पल्सर हा सुद्धा दुकांचीच्या बाजारपेठेत सर्वात जास्त लोकप्रिय असलेला ब्रँड ठरला.
बजाज चेतक प्रमाणेच बजाज पल्सरचे देखील लाखो चाहते अल्पवधीतच तयार झाले.
दोन वेगळ्या पिढ्यांचे साक्षीदार बजाजच्या दुचाकी ठरल्या.
इलेक्ट्रिक स्कुटर
आताच्या काळात, जागतिक वाहन उद्योगाचे भविष्य म्हणून ई-मोबिलिटीकडे पाहिले जात आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स भारताच्या नवीन युगाच्या ईव्ही बाजारपेठेचे नेतृत्व करत आहेत, बजाज ऑटो पुन्हा एकदा स्कूटर्सच्या बाजारात नेतृत्व करायला सज्ज झाले आहे. बजाज चेतक बाजारात परत येईल. पण यावेळी तीला केवळ चेतकच्या रुपात आपला ठसा उमटवायचा आहे.(नव्या चेतकवर बजाज चे ब्रॅण्डिंग नाही) एक यशस्वी उद्योजक आणि पिता राहुल बजाज या नव्या निर्मितीबद्दल म्हणाले “मला खूप आनंद झाला आहे. सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर बनवल्याबद्दल मी राजीव बजाज आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.”
बजाजच्या चेतकने पुन्हा एकदा स्कूटरच्या जगात पुनरागमन केले आहे, परंतु यावेळी इलेक्ट्रिक अवतारात.
इलेक्ट्रिक चेतक चा हा काळ बजाज चेतक असायचा त्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
चेतकला आताची भारतीय पिढी कसा प्रतिसाद देते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
कोटा मध्ये 82 हजार किलोची घंटा बांधली जात आहे,काय आहे खास?
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 12, 2022 21 : 06 PM
WebTitle – Rahul Bajaj The journey from the first scooter to ‘Hamara Bajaj’