केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खडेबोल सुनावले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांनी भारताला लोकशाही आणि स्वातंत्र्याचे धडे देण्याचं काम करू नये, जर या कंपन्यांना भारतात राहून नफा कमवायचा असेल तर त्यांना भारतीय संविधान आणि कायदे पाळावेच लागतील, असे खडेबोल रविशंकर प्रसाद यांनी कंपन्यांना सुनावेल आहेत.
ते सीएनएन न्यूज18 या वृत्त वाहिनीवर चर्चा करत होतो.त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
“नवे नियमांचं पालन करावंच लागेल ही अतिशय पायाभूत गरज आहे. मला पुन्हा एकदा आवर्जुन सांगायचं आहे की
नफा कमावणाऱ्या कंपन्या ज्या अमेरिकेत बसल्या आहेत.त्यांनी भारताला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे धडे देण्याची अजिबात गरज नाही.
भारतात स्वातंत्र्यासोबतच निष्पक्ष पद्धतीनं निवडणुका होतात. आमच्या इथं न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. मीडिया, सिवील सोसायटीलाही स्वातंत्र्य आहे.त्याचवेळी मारिया शकिल या पत्रकार मला अवघड प्रश्न विचारत आहेत आणि मी त्यांच्या प्रश्नांची देखील उत्तरं देत आहे. हीच खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. त्यामुळे कंपन्यांनी आम्हाला लोकशाहीवर धडे देऊ नये”, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांशी संबंधित नियम पाळले जात नाहीत, असे यूएनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे
दरम्यान, युनायटेड नेशन्सच्या विशेष गैरव्यवहारकर्त्यांनी भारत सरकारला पत्र लिहिले आहे की, हे नवीन नियम आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अनुरुप नाहीत, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने रविवारी दिली.
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on JUN 21 , 2021 24 : 53 PM
WebTitle – Profit making American company should stop lecturing us on democracy 2021-06-21