नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे (PM Modi Twitter Account Hack). रविवारी पहाटे पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. खरं तर, प्रधानमंत्री मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करून ‘भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे’ असा दावा करत ट्विट केले होते. हे खोडकर ट्विट काढून टाकण्यात आले असून प्रधानमंत्र्यांचे खाते सुरक्षित करण्यात आले आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयाने (पीएमओ) आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड करण्यात आली होती. हे प्रकरण ट्विटरकडे नेण्यात आले आहे आणि खाते तात्काळ सुरक्षित करण्यात आले आहे. छेडछाड झाली होती त्याकाळात केलेल्या कोणत्याही ट्विटकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
हॅकिंगमध्ये ट्विटरची अंतर्गत प्रणालीचा वापर नाही
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याप्रकरणी ट्विटरने केलेल्या प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, या संपूर्ण प्रक्रियेत ट्विटरच्या अंतर्गत प्रणालीचा वापर करण्यात आला नाही. त्यांना या हॅकिंगची माहिती मिळताच. ट्विटरच्या सपोर्ट टीमने तातडीने चौकशी सुरू केली. तपासाशी निगडित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, “ट्विटरच्या अंतर्गत तपासानुसार, असे दिसते की ट्विटरच्या सिस्टमच्या कोणत्याही उल्लंघनामुळे या खात्याशी तडजोड झाली नाही.”
या अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते
या अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या
वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट हॅक (Twitter Account Hacked) करण्यात आले होते.
त्यावेळी अकाऊंट हॅक करून हॅकरने कोविड-१९ रिलीफ फंडासाठी डोनेशनम्हणून बिटकॉइनची मागणी केली आहे. मात्र, तत्काळ हे ट्विट्स डिलीट करण्यात आले. कोविड-१९ साठी निर्माण करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडात देणगी द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटच्या या ट्विटर अकाउंटवर करण्यात आले होते.
IMDb वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय 10 चित्रपटांमध्ये जयभीम ला स्थान
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 1, 2021 12: 48 PM
WebTitle – Prime Minister Narendra Modi’s Twitter account hacked Twitter explanation