नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट फुलवंती या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहल तरडे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. स्नेहल तरडे या प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या पत्नी असून, त्यांनी सिनेसृष्टीतून काही काळ ब्रेक घेतला होता. या काळात स्नेहल अध्यात्माच्या मार्गावर गेल्या आणि वेदांचा अभ्यास करून त्यामध्ये पदवी प्राप्त केली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्माबद्दल आणि त्यांच्या अध्यात्माच्या अभ्यासाबद्दल भाष्य केले.आपल्या धर्माचे नाव हिंदू धर्म नसून सनातन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अध्यात्माची गोडी बालवयापासून लावावी – स्नेहल तरडे
आरपार युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्नेहल म्हणाल्या की,
मुलांना बालपणापासूनच अध्यात्माची ओढ लागावी. अध्यात्म फक्त वृद्धांसाठी नसून आजच्या पिढीलाही त्याची गरज आहे.
आधुनिक काळात सर्व सुखसोयी असूनही आजच्या तरुणांच्या मनात शांतता नाही. हे त्यांचं मूळाशी असलेलं नातं हरवल्यामुळे घडत आहे. इंग्रजांच्या काळात भारतीयांना मुळांपासून त्यांना तोडले गेले, आणि त्यामुळे अनेक पिढ्या तुटल्या गेल्या. परंतु भारतीय संस्कृती आजही टिकून आहे कारण ती सनातनी आहे, आणि पृथ्वी आहे तोपर्यंत टिकेल.
‘हिंदू धर्म म्हणजे सनातन’
हिंदू धर्माबद्दल बोलताना स्नेहल तरडे म्हणाल्या की, “हिंदू धर्म हा शब्द मी वापरतेय पण खरंतर आपल्या धर्माचं नाव सनातन आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण धर्माच्या जागी ‘हिंदू’ लिहितो, पण हिंदू ही एक संस्कृती आहे, धर्माचं खरं नाव सनातनी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, धर्माचे वेगवेगळे तुकडे करून जातींमध्ये विभागलं गेलं आहे, ज्यातून एकमेकांविरुद्ध द्वेष निर्माण झाला आहे.”
आजच्या तरुणाईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “हल्लीच्या मुलांकडे सगळ्या सोयी सुविधा सगळं व्यवस्थित आहे.पण तरीही मन सैरभैर आहे.कारण ते त्यांच्या रुट्सना धरून नाहीयेत,आणि याचं कारण त्यांचे पालक रुट्सना धरून नाहीयेत. आजच्या जगण्यात अध्यात्म, वेद कसे रिलेव्हन्ट असतील याचा पालकांचा अभ्यास नाही,त्यामुळे पालकही दोषी नाहीयेत.सिस्टिमच अशी उखडून ठेवली आहे इंग्रजांनी,” आपण हिंदू-ब्राह्मण लिहितो,हिंदू मराठा लिहितो हे आपल्याला सिस्टीमॅटिकली तोडलं गेलेलं आहे,वेगवेगळ्या जातींमध्ये आणि त्याच्यामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे.” स्नेहल यांनी आशा व्यक्त केली की, “माझी मनापासून इच्छा आहे की सगळ्या जातींनी एकत्र यावं,ब्राह्मण जातीचे वेगळे कुळाचार आहेत मराठा जातीचे वेगळे जगणे आहे.माळी आणि इतर असतील सर्वांचे जगणे वेगळे आहे. पण आपण हे वेगळेपण सेलिब्रेट करायला शिकलं पाहिजे.तर हिंदू धर्म टिकून राहिल आणि एकसंध राहिल आणि ही गरज आहे.”
यानंतर सोशल मिडियावर मात्र आता चर्चेला तोंड फुटले आहे.अनेकांनी आपली मते मांडली असून काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे,काहींनी विरोध तर काहींनी समर्थन केले आहे.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 29,2024 | 20:28 PM
WebTitle – praveen-tarde-wife-snehal-tarde-sanatan-dharma-hindu-culture
#SnehalTarde #PraveenTarde #SanatanDharma #HinduCulture #IndianSpirituality #SpiritualJourney #Hinduism #IndianTradition #HinduPhilosophy #CulturalUnity