आग्रा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाच्या ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्र्यात घडलेल्या घटनेनं पोलीस प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिसांनी VIP साठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावला.पोलिसांच्या मनमानीपणामुळे एका महिलेचा जीव गेला आहे.
आग्र्यातील एका रुग्णालयात १७ वर्षांच्या तरुणाची आई उपचार घेत होती. तिच्यासाठी तरुणानं कसाबसा ऑक्सिजन सिलिंडर मिळवला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडून ऑक्सिजन सिलिंडर हिसकावला. तरुण पोलिसांसमोर गुडघ्यावर बसून, हात जोडून ऑक्सिजन सिलिंडर परत द्या अशी विनंती करत होता. मात्र पोलिसांनी जराही दया आली नाही. ‘सिलिंडर नेऊ नका. माझी आई मरेल. मी तिच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था कुठून करा?’, अशी आर्त साद घालत तरुण आक्रोश करत होता.
आग्र्यातील रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि वर्तणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अतिरिक्त पोलीस संचालक राजीव कृष्णा यांनी व्हायरल व्हिडीओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आग्र्याच्या एका रुग्णालयात काही पोलीस कर्मचारी ऑक्सिजन सिलिंडर नेण्यास आले होते. त्यांनी एका मुलाला ऑक्सिजन सिलिंडर नेताना पाहिलं. त्यांनी त्याच्याकडून सिलिंडर हिसकावून घेतला. व्हिडीओमध्ये पीपीई किट घातलेला मुलगा गुडघ्यावर बसून पोलिसांकडे सिलिंडर परत देण्याची विनंती करताना दिसत आहे.
पोलिसांकडून खंडन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आग्र्यातल्या उपाध्याय रुग्णालयातला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचं नाव अंश गोयल आहे. अंशला मोठ्या मुश्किलीनं आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळाला होता. मात्र मोकळा सिलिंडर दोन व्यक्ती भरायला घेऊन जात होते असे स्पष्टीकरण आग्रा पोलिसांनी दिले आहे.
पोलिसांच्या दाव्याच्या खंडन
दोन व्यक्ती मोकळा सिलिंडर घेऊन जात होते या पोलिसांच्या दाव्याला एक सोशल मिडिया युजरने दूसरा पूर्ण व्हिडिओ टाकून प्रश्न विचारत म्हणले आहे की “साहेब पोलिस वाले ऑक्सीजन सिलिंडर घेऊन चालले आहेत. तेही हॉस्पिटलमधून,हा पूर्ण व्हिडिओ आहे पाहा,यांच्यावर कारवाई होणार का?”
युपीचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट यांचा कोणतीही कमी नसल्याचा दावा
या घटनेत आग्रा पोलिस “थोडीसी किल्लत” म्हणजे थोडी कमतरता होती असं म्हणताना दिसतात.
मात्र युपीचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट म्हणतात कोणतीही कमी नसून सर्व सामग्री व्यवस्थित आहे.
काही लोक मुद्दाम अफवा पसरवत आहेत. अशाप्रकारचा एक व्हिडिओ सुद्धा एका युजरने शेअर केला आहे.
आता पोलिस खरे की मुख्यमंत्री या प्रश्नाचे उत्तर कोण देणार अशी चर्चा रंगू लागली आहे.
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on MAY 02, 2021 14: 30 PM
WebTitle – Police Snatched Oxygen Cylinder From Son In Agra Mother Die After Two Hours 2021-05-02