दिल्ली, दि.21 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४ निवडणुकीपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. करोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे.मात्र या बैठकीचं काँग्रेसला बोलवणं नाही.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणार राष्ट्र मंचाची बैठक
मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात भाजपा विरोधी पक्षांची राष्ट्रमंचाची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी मंगळवारी होणार आहे. राष्ट्र मंचच्या बैठकीत शरद पवार पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.
यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचाची स्थापना केली
राष्ट्र मंचाची स्थापना 2018 मध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली होती.
मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शरद पवार, यशवंत सिन्हा,यांच्याशिवाय आम आदमी पार्टीचे संजय सिंह,
पवन वर्मा यांच्यासह काही नेते येण्याची शक्यता आहे.
बैठकीत कॉंग्रेस नेते सामिल होणार नाही
शरद पवार यांच्या घरी मंगळवारी राष्ट्र मंचची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कॉंग्रेस नेते उपस्थित राहणार नाहीत. कॉंग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा आणि मनीष तिवारी या मंचाचे सदस्य आहेत. परंतु ही बैठक पवारांच्या घरी होणार असल्याने कॉंग्रेस नेते त्याला उपस्थित राहणार नाहीत.
राष्ट्र मंचला ममता बॅनर्जी यांचेही समर्थन
राष्ट्र मंचाची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता तृणमुल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. राष्ट्र मंचला आधीच ममता बँनर्जी यांचे समर्थन आहे.
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पहिल्या बैठकीत जवळपास ४ तास या दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर ११ जूनला पुन्हा एकदा बैठक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ च्या निवडणुकीत रोखण्यासाठी रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही काँग्रेस महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक २४ जूनला आहे.
सैखोम मीराबाई चानू ची टोकीयोत चमक; ऑलिम्पिक चा इतिहास
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 21 , 2021 17 : 31 PM
WebTitle – Sharad Pawar’s new innings against Modi !; Opposition parties to meet in Delhi tomorrow 2021-06-21