Pandora Papers Leak झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.जगातील धनाढ्यांनी विदेशात संशयास्पदरित्या आर्थिक गुंतवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स (Pandora Papers) या शोध मोहिमेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासह 300 भारतीय दिग्गजांची नावं असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, या पेपर्समध्ये सचिन सोबत त्याची पत्नी अंजली तेंडूलकर (Anjali Tendulkar), आणि सासरे आनंद मेहता (Anand Mehta) यांच्या नावाचाही समावेश आहे.
अनिल अंबानी ने सांगितलं होतं नेटवर्थ शून्य
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्या विरोधात
मागीलवर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये यूके कोर्टात खटला सुरू होता.
हे प्रकरण चीनच्या तीन मोठ्या बँकांच्या वतीने अनिल अंबानींच्या विरोधात करण्यात आले आहे.
7 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनिल अंबानी यांना
07 अब्ज, 15 कोटी, 16 लाख (100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या बरोबरीची) रक्कम
सहा आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
अनिल अंबानी यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता की त्यांच्या क्लायंटची नेटवर्थ किंमत शून्य आहे, ते दिवाळखोर आहेत, त्यामुळे ते कर्जाचा एक पैसाही परत करू शकत नाहीत. यावर न्यायालयाने त्याला विचारले की त्यानी भारतात स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे का? त्यावर अनिल अंबानींच्या वकिलांनी ‘नाही’ असे उत्तर दिले होते.यावेळी अनिल अंबानींच्या वकिलांच्या टीममध्ये हरीश साळवे यांचाही समावेश होता.
त्यावेळी बँकांच्या वकिलांनी असाही युक्तिवाद केला की जर अनिल अंबानी दिवाळखोर असतील तर
त्यांना त्यांच्या वकिलांची फी कोठून मिळते.
प्रति सुनावणी सुमारे 5 कोटी रुपये. बँकांच्या वकिलांनी अंबानींच्या जीवनशैलीचाही उल्लेख केला.वकिलांनी सांगितले की अंबानी यांच्याकडे 11 आलिशान कार, एक खाजगी जेट, नौका आणि दक्षिण मुंबईतील सीविंड पेंटहाऊसमध्ये भाडे मुक्त प्रवेश आहे.
Pandora Papers Leak १.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती उघड
इंडियन एक्स्प्रेसद्वारे पँडोरा पेपर्सच्या तपासात रिलायन्स एडीए (Reliance ADA) समूहाचे अध्यक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींकडे जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रससारख्या ठिकाणी कमीतकमी १८ परदेशी कंपन्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या कंपन्यांची स्थापना २००७ ते २०१० दरम्यान करण्यात आली होती आणि यापैकी सात कंपन्यांना गुंतवणूक आणि कर्जांमध्ये किमान १.३ अब्ज डॉलर्स मिळाले. जर्सीमध्ये अनिल अंबानींच्या नावे बॅटिस्ट अनलिमिटेड, रेडियम अनलिमिटेड आणि ह्युई इन्व्हेस्टमेंट्स अनलिमिटेड या तीन कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांची स्थापना डिसेंबर २००७ आणि जानेवारी २००८ मध्ये करण्यात आल्याचंही इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 04, 2021 15:23 PM
WebTitle – Pandora Papers Leak Anil Ambani’s net worth of 1.3 billion revealed