नागपूर : रेव्हेन्यू कायद्यान्वये जो व्यक्ती सतत १२ वर्षे एखाद्या जागेवर स्थायीक राहत असेल तर तो त्या जमीनीचा कायदेशीर मालक बनतो. परंतू या कायद्याचा विसर स्वतः माननीय कोर्टालाच पडला असल्याची घणाघाती टिका आज वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.यावेळी त्यांनी प्रश्न न सुटल्यास मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू असा इशारा दिला आहे.नागपूर येथे विधानभवनावर काढण्यात आलेल्या ‘इशारा मोर्चा’ मधे ते बोलत होते.
महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने परिवार हे मागील ४०-५० वर्षांपासून गायरान जमिनिवर अतिक्रमण करून वास्तव्य करत आहेत.परंतू कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आलेली आहे. व या सर्वांमधे महाराष्ट्र शासन हे निव्वळ बघ्याची भुमिका घेत असून स्वतःला सामान्य कुटूंबातील सांगणाऱ्या मुख्यमत्र्यांनी जर लवकरात लवकर भुमिका घेऊन गायरान जमीनीचा प्रश्न सोडवला नाही तर, रस्ता व आमचं नातं खुप जूनं आहे तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी महापूरूषांबद्दल जे काही विधान केले त्यामधे काहीही नाविन्य नसून ती संघाची खुप अगोदरची मानसिकता आहे,
चंद्रकांत पाटील यांनी यामधे संघाच्या संस्थांचे नाव न घेत त्या खोके संस्कृतीतून निर्माण झाल्याची कबूलीच दिली
त्याकरिता चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर सत्कार करायला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी तर्फे इशारा मोर्चा चे आयोजन आज करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर, अशोक सोनोने, अरूंधती शिरसाठ, सविता मुंडे, डॉ निशा शेंडे,विलास वटकर, संगिता गोधनकर, शमिभा पाटील, अमित भुईगळ, डॉ रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, राजू लोखंडे, विश्रांती रामटेके, रवी शेंडे, मुरली मेश्राम, अरविंद सांदेकर, इत्यादि पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
वंचित आघाडी व शिवसेना युती संदर्भात लवकरच घोषणा
फ्रॅक्चर्ड फ्रीडम कोबाड गांधी ; पुस्तकात नेमकं काय?
भगवान बुद्धांच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यावरून वाद, प्राचार्यांचे स्पष्टीकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 27,2022, 22:18 PM
WebTitle – we will block the path of the Chief Minister, Adv. Prakash Ambedkars warning