या महिलांचा फेसबुक, ट्विटर, जीमेल, रेडीफाईलशी काही संबंध नाही नसतो फक्त या सामान्य महिला आपले काम विलक्षणपणे करत राहतात आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात व चालत राहतातकेसरबाई बामनिया, गाव घाटियान, ग्रामपंचायत- देलवाडा, तहसील – घाटोल जिल्हा- बसवाडा,महिला सक्षम गटाचे नाव – दशमाता महिला सक्षम समूह
केसरबाई ही-43 वर्षांची आदिवासी अल्पभूधारक शेतकरी महिला आहे जी आपली उदरनिर्वाहाची शेतीवर करते आणि पती रंगलाल बामनिया यांच्यासह दोन बीघा जमीनीवर कोरडवाहू शेतीत गहू मकाची लागवड करतात. केसरबाईच्या कुटुंबात 4 मुले व 1 मुलगी आहेत आणि तेथे 8 गायी आणि 3 शेळ्या शेतीसाठी पूरक जनावरे आहेत. केसरबाई शेतीतील मजुरीबरोबरच घरकाम ही करतात.
जैविक शेती ची गरज
केसर बाई ह्या 2018 पासुन वाघाधारा संस्थाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या दशामाता महीला सक्षम समूह च्या सदस्या बनल्या ज्यामध्ये केसर बाई यांना सच्ची खेती म्हणजे काय आणि जैविक शेतीची गरज या बद्दल वागधारा च्या प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले आणि आजच्या जगात सेंद्रिय शेती कशी संबंधित आहे.या बद्दल समूहातील २० सक्षम गटातील महिलांना सांगितले.वाघधारा संस्थानचे गौरी गंडोत यांनी केसरबाई गटाच्या बैठकीत शाश्वत एकात्मिक शेती व गांडूळ कंपोस्ट दासपर्णी यांचे प्रशिक्षण दिले आणि केसरबाई सेंद्रिय शेतीकडे आकृष्ट झाल्या नियमित सहभाग नोंदविला.
वाघधारा संस्थेने या सक्षम गटांना भाजीपाला बियाणे दिले, त्यांना कोथिंबीर मिरची, बिंगण टोमॅटो, कांदे इत्यादी देण्यात आल्या. वाघाधाराचे उद्दीष्ट असे होते की या महिलेने जेथे जमीन मिळेल तेथे त्यांच्या पौष्टिक बाग लावावे आणि पौष्टिक बागेची भाजी खावी जेणेकरून त्यांचे आरोग्य ठीक राहील . केसरबाई यांनी त्यांच्या घरातच परसबाग तयार केले.
आश्चर्याची बाब म्हणजे, 2018-19 मध्ये कांद्याची बियाणे केसरबाईंनी खाण्यापुरताच लागवड केली
आणि 2020 मध्ये स्वःता बियाणांचे संवर्धन करुन बाजारातील महागडे बिया न घेता दोन वर्षे स्वतः तयार केलेले
कांद्याचे बियाणे 20 / बाय 5 या भु-भागावर लागवड केली
आणि सेंद्रीय औषध आणि गांडूळ खत घालून 1.5 क्विंटल कांद्याचे उत्पादन केले.
जो कांदा बाजारात 13 रुपयांना विकतात तोच सेन्द्रीय कांदा 30-35 रुपये भावाने विकला
आणि त्यांना 3500 / – रुपये उत्पन्न मिळाले. विशेषत: हे सर्व कांदे चे उत्पादन बोअरवेलमधील सांडपपाण्यापासून घेतले गेले.
कमी स्त्रोतांद्वारे आपण आपले जीवनमान कसे अधिक चांगले बनवू शकतो
याचे केसरबाईंनी एक अद्वितीय उदाहरण आहे आणि हे गावातील इतर स्त्रियांसाठी देखील प्रेरणास्थान बनले आहे.
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 11 , 2021 22 : 30 PM
WebTitle – Onion crop brings tears of joy in Kesarbai Bamania’s life 2021-04-12