पुणे,(प्रतिनिधी) : शेलारवाडी आणि बेडसे बुद्ध लेणी येथे कार्यशाळा उत्साहात संपन्न:पुणे येथे झालेल्या सोळाव्या कार्यशाळेत भारताच्या वैभवशाली, प्राचीन इतिहासाला जाणून घेण्यासाठी आणि बुध्द लेणींची जनजागृती करण्यासाठी मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीम ने शेलारवाडी बुद्ध लेणी आणि बेडसे बुद्ध लेणी येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या अगोदर मार्गदर्शक व इतिहास उलगडणारे असे कोणीच नव्हते; पण आता खऱ्या अर्थाने ती सुरुवात मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीम च्या मार्फत सुरू झाली आहे. लेणीच्या निर्मिती मागील इतिहास, तत्कालीन सामाजिक संरचना, कालखंडानुसार अतिक्रमणे, शिल्पांचा अर्थबोध, धम्मलिपि या बाबी मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीम च्या मार्फत कळू लागल्या आहेत. संशोधनाची अपूर्ण भूक आता आणखी वाढलीय हे असे मनोगत उपस्थित धम्म बांधव व भगिनींनी व्यक्त केले.
महाराष्ट्रभरातून शेकडो लेणीसंवर्धक या कार्यशाळेला उपस्थित
दिनांक १९/१२/२०२१ रोजी मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, परभणी, जालना सह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून शेकडो लेणीसंवर्धक या कार्यशाळेला उपस्थित होते.
शेलारवाडी बुध्दलेणी ही अतिक्रमित लेणी असून या ठिकाणी ३ लेणींवर अतिक्रमण केलेले आहे ही लेणी हीनयान पंथीयांच्या शेवटच्या अखेरच्या काळातील ही लेणी आहे असे या लेणीच्या रचना आणि व वैशिष्ट्यांवरून समजते. ही लेणी पुणे येथून २५ किलोमीटरवर देहूरोड जवळ असून याठिकाणी ११ लेण्यांचा समूह आहे.शेलारवाडी लेणीच्या समूहात एकच चैत्य असून या दालनात ९ खोल्या आहेत. पूर्वी या दालनात स्तूप होता परंतु त्या ठिकाणी स्तूप तोडून तिथे घोरवडेश्वर शिवलिंग ची स्थापना करण्यात आली आहे. पूर्वी तिथे स्तूप होता हे छताला धरून राहिलेल्या हर्मिकेवरून आपल्याला पहावयास मिळते.
या लेणीमध्ये दोन शिलालेख आपल्याला स्पष्टपणे पहावयास मिळतात.
त्यामधील चैत्यगृहात असलेल्या शिलालेखात बुध्दचचेतीयघरो असा उल्लेख आढळतो.
येथील सर्व शिलालेखांचे वाचन व अर्थ आनंद खरात आणि मनोज गजभार यांनी सांगितले.
लेणीची थोडक्यात माहिती सागल गायकवाड यांनी सांगितली.
आपण लेणीवर न आल्यामुळे अश्याप्रकारची अतिक्रमणे होत राहतात
या बद्दल प्रभाकर जोगदंड आणि संतोष वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
या ठिकाणी सर्व लेणीसंवर्धक सामूहिक बुध्दवंदना घेऊन पुन्हा इतर कोणत्याही लेणीवर
अश्याप्रकारे अतिक्रमण होणार नाही असा संकल्प करून बेडसे लेणीकडे रवाना झाले.
बुद्ध लेणी बेडसे
बेडसे लेणी म्हणजे मारकुट (मारा याचा पर्वत) असे या लेणीमधील शिलालेखांमधून समजते. बेडसे लेणी ही पूर्वाभिमुख खोदलेली आहे. या लेणीसमुहात तीन चैत्यगृह यापैकी एक अर्धवट अवस्थेत आहे, एक भव्य विहार, दोन छोटे विहार तर त्यातील एक अर्धवट अवस्थेत आहे. सहा पाण्याच्या (पोढ्या) टाक्या या लेणीसमूहात कोरलेल्या आहेत.
लेणीचे सौंदर्य चैत्यगृहात आणि आगळ्यावेगळ्या विहारात आहे. ही लेणी हीनयान पंथातील असून लेणीचे खोदकाम हे इ. स. पूर्व पहिले शतक ते इ. स. पहिले शतक या कालखंडात चालू होते. बेडसे लेनिसमूहात एकूण १३ लेणी आहेत या विषयी माहिती प्रभाकर जोगदंड आणि विकास खरात यांनी सांगितली.
शिलालेखांची माहिती, त्याचा अर्थ मनोज गजभार आणि आनंद खरात यांनी सांगितला. सूत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले, मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीमची वाटचाल आणि ध्येय शशिकांत निकम यांनी सांगितले. बुद्ध धम्मतील १० पारमिता पैकी सर्वात महत्त्वाची पारमिता म्हणजे दान पारमिता, तिचे महत्व संतोष आंभोरे यांनी समजावून सांगितले. प्रवीण जाधव यांनी आलेल्या सर्व लेणीसंवर्धकांचे आभार मानले.
या कार्यशाळेत विजय कापडणे, आशिष भोसले, रितेश गांगुर्डे, रवी कांबळे, पांडुरंग सरकटे, सुरेश कांबळे, दीपक सुरवाडे, अजय तांबे, प्रभाकर लोखंडे, सिद्धार्थ खरे, आकाश खरे, साधना गांगुर्डे, शीला रवींद्र पाटील, व इतर सर्व लेणी संवर्धक आत्मीयतेने उपस्थित होते.
मनसर विश्व विद्यापीठ येथे MBCPR टीम तर्फे कार्यशाळा संपन्न
कोंढाने बुद्ध लेणी व आंबिवली बुद्ध लेणी येथे कार्यशाळा संपन्न
जेम्स वेब दुर्बीण (स्पेस टेलिस्कोप ) इतिहासाचे साक्षीदार बना
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 21, 2021 19: 40 PM
WebTitle – One day workshop at Shelarwadi Buddha Caves and Bedse Buddha Caves